पान:बाणभट्ट.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

111 JAN ( ८३ ) येतो असें हर्षाच्या वर्णनांतहि आहे. हे त्याचें दातृत्व पाहून 'आदानं हि विस- गय सतां वारिमचामिव ।' सज्जनांचा द्रव्यसंग्रह मेघांच्या जलसंचयासारखा परोपकाराकरितां आहे ! ह्या कविकुलगुरूच्या उक्तीचें स्मरण होतें ! इ. स. ६४४ त त्यानें गंगा यमुनेच्या संगमाजवळ प्रसिद्ध पुण्यक्षेत्र प्रयाग येथे सुमारें तीन महिनेंपर्यंत सर्वजातीच्या व सर्व धर्माच्या जमलेल्या हजारो लोकांनां अन्नसंतर्पण केले. अन्नदानाच्या शेवटी त्याने 'समं पश्यन हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् ' ह्या भगवद्गीतेतील वचनाप्रमाणें मनांत भेद न आणतां, ब्राह्मण, बौद्ध भिक्षु, बैरागी वगैरे जमलेल्या सर्व लोकांस आपल्या खजिन्यांतील रत्नादिक सर्व द्रव्य व मौल्यवान् वस्तु, तशींच स्वताची उंची - उंची वस्त्रे दान केलीं व बुद्धाप्रमाणेच आपण निष्कांचन होऊन त्याने स्वतः अगदीं दीनजनासारखा पोषाक धारण केला ! हर्षाचें हें औदार्य व निष्कां- चनत्व पाहून ' नास्त्यदेयं महात्मनाम् ' ह्या वचनाचें स्मरण होतें ! आणखी 'विश्वजित्' यज्ञामध्ये अर्थजनाला सर्वस्व दान करून शरीरमात्रानें अवशिष्ट राहिलेल्या व कविकुलगुरूनें त्या वेळच्या स्थितीत वर्णन केलेल्या- 'शरीरमात्रेण नरेन्द्र तिष्ठन्नाभासि तीर्थप्रतिपादितर्द्धि: । अरण्यकोपाच- फलप्रसूतिः स्तम्बेन नीवार इवावशिष्टः।'हे राजा, सत्पात्रीं सर्वसंपत्तीचा विनि- योग करून शरीरानें मात्र अवशिष्ट राहिला आहेस अशा - रघुराजाप्रमाणे तो दिसला असावा ! 'तन्निन्ना शोभन्ते गलितविभवाश्चार्थिषु नराः।' उदार पुरुष हे याचकांना सर्वस्व देण्यानं गतवैभव झाले तरी शोभतात ! हे भर्तृहरीचें वचन अगदी यथार्थ आहे ! यावरून हर्षराजा हा कर्णासारखा केवळ रणशूरच होता असें नाहीं, तर तो त्याच्यासारखा दानशूंरहि होता असे लक्षांत येतें ! हर्षानें शिव, व सूर्य यांच्या देवालयांप्रमाणे बुद्धाचेंहि देवालय बांधलें, अर्से हुएनसँगच्या वर्णनांत आहे. धावक हा कोण? यावद्दल व हर्पानें वाणास व बाणानें हर्षास मोठी देणगी दिली यावद्दल. काव्यप्रकाशांत 'श्रीहर्पादेर्षावकादीनामिव धनम् ' असें काव्या पासून द्रव्यप्राप्तिरूप फलाचें उदाहरण दिले आहे. ह्यावरच्या एका (महेश्वर) १ श्रीहनें दानशूरत्वाची कृति नागानंदांत जीमूतवाहनपात्राचे आचरणांत चांगली दाखविली आहे.