पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| अहवाल, इतर वन अभिलेख, प रा किंवा भाडेप | यांपैकी कोणत्याही नावाने | ओळखल्या जाणा-या हक्कांचा अभिलेख यासारखे शासकीय अभिलेख, समित्या किंवा आयोगांचे शासनाने घटित केलेल्या अहवाल, शासकीय आदेश, अधिसूचना, परिपत्रके, ठराव; (ख) मतदार ओळखपत्र, शिधावाटप पत्रिका, पासपोर्ट, घरपीच्या पोच पावत्या, अधिवास प्रमाणपत्रे यासारखे शासनाने प्राधिकृत केलेले दस्तऐवज. (ग) घर झोपड्या व जमिनीवर केलेल्या स्थायी सुधारणा, जसे, समतलन, बांध बांधणे, रोधी बांध व तत्सम इतर भौतिक गुणविशेष; (घ) न्यायालयीन आदेश व न्याय निर्णय यांचा समावेश असलेले न्यायिकवत् व न्यायिक अभिलेख; (ङ) कोणत्याही वन हक्कांचा उपभोग दर्शविणा-या आणि रुढिगत कायद्याचे बळ असणा-या रुढींचा व परंपरांचा भारतीय मानववंशशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेसारख्या नामांकित संस्थेने केलेला संशोधनात्मक अभ्यास व लेखांकन; । (च) भूतपूर्व प्रांतिक राज्य किंवा प्रांत किंवा अशा इतर मध्यस्थ संस्थांकडून मिळालेला कोणताही अभिलेख. यात नकाशे, हक्क नोंदी, विशेषाधिकार, सूट, अनुग्रह यांचा अंतर्भाव असेल; (छ) प्राचीनत्व सिद्ध करणा-या, विहिरी, दफनभूमि , पवित्र स्थळे यांसारख्या पारंपारिक रचना, (ज) पूर्वीच्या भूमि अभिलेखात नमूद केलेली व्यक्तींच्या पूर्वजांचा माग काढणारी किंवा पूर्वीच्या काळी त्या गावातील कायदेशीर रहिवासी असल्याची ओळख पटविणारी वंशावळ; (झ) मागणीदाराखेरीज अन्य वडीलधाच्या माणसांचे लेखानिविष्ट कथन वरील १ ते ६, तसेच ७ बाबतीत प्रत्येक हक्कासाठी नियमाच्या कलम १३ मध्ये नमुद केलेल्या पुराव्यपैकी कमीत कमी दोन सबळ पुरावे अवश्य नमुद करावे व त्या पुराव्यांची प्रत सोबत जोडण्यात यावी. आवश्यक असल्यास मागणीदार संबंधित विभागाकडूनही आवश्यक पुरावे प्राप्त करु शकतात. ९. कोणतीही अन्य माहिती अर्जाची पोच पावती (कार्यालयासाठी) मागणीदाराचे नांव