पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| हे नियोजन काही विशिष्ट (१) भू/जलभागांबद्दल किंवा (२) जीवजातींबद्दल असू शकेल. ते मानवी हस्तक्षेप, विशेषतः काही संसाधनांचा उपभोग, कापणी-दोहन, काय प्रकारे व किती प्रमाणात करण्याची मुभा असावी, याबद्दल असू शकेल. तसेच संसाधनांची जोपासना करण्याबद्दल, त्यांची लागवड, त्यांच्या प्रमाणात वाढ करण्याच्या प्रयत्नांबद्दल असेल. याबरोबरच हे नियोजन स्थानिक प्रयत्नांतून संसाधनांची मूल्यवृध्दि करण्याबाबत आणि चांगली बाजारपेठ, चांगला भाव मिळवण्याबाबत, विक्री करण्याबाबत असेल. ह्या संदर्भातील कृति आराखडे बनवताना वेग-वेगळ्या हितसंबंधी गटांच्या सदस्यांशी व्यवस्थापनासंबंधी चर्चा करून माहिती नोंदवली जाईल. यासाठी त्यांना स्वतःला काय आवडेल, या बरोबरच त्यांच्या दृष्टीने आजमितीस प्रत्यक्ष कृतीत काय आणणे शक्य आहे, याचाही विचार करून सर्वसंमतीने बनू शकेल अशा एका कृति आराखड्यात अंतर्भूत करण्यासाठी त्यांच्या कल्पना नोंदवायच्या आहेत. या सगळ्या माहितीचा वापर करून सर्वांचा पाठिंबा असलेली व्यवस्थापन योजना बनवणे ही या सर्व खटटोपीची फलश्रुति असेल. अशा व्यवस्थापन आराखड्याला अंतिम स्वरूप देताना समाजाच्या सर्व हितसंबंधी गटांच्या आशा आकांशा लक्षात घेऊन ग्राम सभेने एक सर्वसहमतीचा निर्णय घेणे योग्य ठरेल. ठाकुरवाडीः तक्ता १४: जीवजाती व संबंधित भूभागांशी निगडित असा कृति आरखड्यातील तपशील अक्र जीवाचे स्थानिक नाव सागवन दुधारी धावडा साधारण साधारण दुर्मिळ सध्याचे वनस्पती, प्राण्यांचे प्रमाण (आता आढळत नाही, दुर्मीळ, साधारण प्रमाणात, भरपूर) गेल्या १० | (खूप वाढ, थोडी वाढ, बदल नाही, | साधारण घट | साधारण । वर्षांतील | साधारण घट, खूप घट) प्रमाणातील बदल बदलाचे कारण जंगल तोडीमुळे जंगलतोड | | वृक्ष आढळत नाही