पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Eि 5- 0 पूरनिवारण व संरक्षण, दलदलीच्या जमिनीचा निचरा ग्रामीण भागासाठी बारमाही रस्ते, ओढ्यांवरील पूल राज्य सरकारांच्या सल्ल्याने केंन्द्र शासनाने मान्य केलेली दुसरी कामे या योजनेखाली केलेल्या कामांची तन्दुरुस्ती, वनीकरण केलेल्या क्षेत्राचे संरक्षण या सर्व कामांसाठी प्रमाणबद्ध आराखडे जिल्हा पातळीवर बनवून ग्राम पंचायती व इतर अंमलबजावणी करणाच्या निगमांना पुरवण्यात येतील. ह्यातील कामे निवडून, ती कोण-कोणत्या जल-जंगल-जमीन-शेतीच्या टापूत करायची याची सर्व योजना बनवण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. तेव्हां सामूहिक वनसंपत्तीच्या क्षेत्रासाठी यातील सयुक्तिक कामे निवडणे, त्यांच्यासाठी जिल्हा पातळीवरून पुरविलेल्या प्रमाणबद्ध आराखड्यांच्या सहाय्याने आखणी करणे, त्यासाठी किती श्रम लागतील, किती स्त्रीपुरुषांना रोजगार उपलब्ध होईल, याचा हिशोब करणे, ही कामे कोणत्या दिवसांत करावयाची हे ठरवणे, हे सारे नियोजन प्रक्रियेत अंतर्भूत करता येईल. याच्या जोडीला जर सामूहिक वनसंपत्तीच्या जोपासनेसाठी उचित व रोहयोच्या चौकटीत बसतील अशी कामे त्या जिल्ह्याच्या प्रमाणबद्ध आराखड्यात नसतील, तर ती अंतर्भूत ह्वावीत म्हणून जरूर खटपट करावी. | ह्या दृष्टीने ज्या ज्या कुटुंबांना रोहयो अंतर्गत रोजगार हवा आहे, त्यांच्यातील सर्व रोजगार घेऊ इच्छिनाच्या व्यक्तींबाबत (१) नांव (२) पिता/पतीचे नांव (३) वय (४) अनुसूचित जाती, जमातीचे सदस्यत्व (५) जमीन सुधारणेत जमीन मिळाली का, (६) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी आहेत का, (७) पोष्टातील अथवा बँकेतील खात्याचा क्रमांक व बँकेचे कोड (८) पत्ता तसेच (९) छायाचित्र ही माहितीही सामूहिक वनसंपत्तीच्या नियोजनाचा एक भाग म्हणून गोळा करावी. या सोबत, त्या व्यक्तींना किती दिवसांसाठी रोजगार हवा आहे, आणि असा रोजगार कोण कोणत्या महिन्यांत अपेक्षित आहे ह्याचीही नोंद करावी. तक्ता ८: रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार अपेक्षीणाच्या कुटुंबियांची माहिती | नोंदणी क्रमांक रोहयोखाली केलेल्या अधिकृत नोंदणीचा क्रमांक || | नोंदणीचा दिनांक रोहयोखाली केलेल्या अधिकृत नोंदणीचा दिनांक | m। ३ | कुटुंब प्रमुखाचे नाव पहिले नाव