पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पर्यंत (महिना/ नक्षत्र) | डिसेंबर भटक्यांच्या दृष्टीने या जागेचे महत्व मासेमारीसाठी परंपरा (१) पशुपालन (२) १) भ्रमंती पारंपारिक १) पशुपालन महत्वाचे २) भ्रमंती अंशतः पारंपारिक २) पशुपालन गैर महत्वाचे ३) भ्रमंती नव्याने सुरू झालेली

  • रोजगार हमीची मागणी [तक्ता ८] राष्ट्रीय रोजगार हमी योजना (रारोहयो) ही सामूहिक वनसंपत्तीची जोपासना करण्यासाठी लोकांचा सहभाग मिळवण्यासाठी चांगली संधि आहे. रारोहयोनुसार प्रत्येक कुटुंबातील सर्व व्यक्तींना मिळून प्रतिवर्षी १०० दिवस रोजगार पुरवण्याची हमी दिलेली आहे, महाराष्ट्रात तर ही हमी पूर्ण वर्षाकरता आहे. तेव्हा कोणाला कोठे रोजगार हवे आहेत ह्याची ठीक नोंद करून ह्या मागणीची सामूहिक वनसंपत्तीच्या संवर्धनाशी सांगड जोडावयास हवी. सामूहिक वनसंपत्तीसारख्या क्षेत्रांत जमीन सुधारून त्यांवर लोकोपयोगी अशा वनस्पतीसृष्टीचे, वृक्षराजीचे आच्छादन पुन्हा निर्माण करणे हे रारोहयो कामांचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत खालील प्रकारची कामे होऊ शकतात.

(क) जलसंधारण, जल संचय व भूजल पुर्नभरण (ख) दुष्काळनिवारण, वनीकरण व वृक्षारोपण पाणी पुरवठ्यासाठी कालवे, सूक्ष्म व गौण बंधारे (घ) अनुसूचित जाती/जमाती, जमीन सुधारणा कायद्याचे लाभार्थी व इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी यांच्या स्वत:च्या मालकीच्या जमिनीवर भूसंधारण व पाणीपुरवठा (च) पारंपारिक जलाशयांचे पुनरुज्जीवन, तळ्यांतील गाळ काढणे (छ) भू-संधारण PE