पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लगाने लपविभाग अपवित्रस्तरीय स पायरी ९. उपविभागीय पातळीवरील समितीने प्रस्तावित प्रकरणे तयार करुन ती जिल्हा पातळीवरील समितीकडे पाठविणे उपविभागीय पातळीवरील समितीने प्रस्तावित प्रकरणे तयार करुन ती जिल्हा पातळीवरील समितीकडे पाठवावयाची आहेत. उपविभागस्तरीय समितीच्या निर्णयामुळे व्यथित झालेल्या व्यक्तीने पुढील प्रमाणे कार्यवाही करावीः १) उपविभागस्तरीय समितीच्या निर्णयामुळे व्यथित झालेल्या व्यक्तीने/ समूहाने उपविभाग स्तरीय समितीचा निर्णयाच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या आत जिल्हा स्तरीय समितीकडे विनंती अर्ज दाखल केला पाहिजे. जिल्हा स्तरीय समिती अशा विनंती अर्जाचा विचार करुन तो निकालात काढील. २) परंतु उपविभागस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करण्यात आल्याखेरीज आणि तिने त्यावर विचार केला असल्याखेरीज, ग्रामसभेच्या निर्णयाविरुद्धचा कोणताही विनंती अर्ज थेट जिल्हा स्तरीय समितीपुढे दाखल करण्यात येणार नाही. ३) व्यथित व्यक्तीला/ समूहाला त्याची बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्याखेरीज असा कोणताही विनंती अर्ज व्यथित व्यक्तीच्या विरुद्ध निकालात काढला जाणार नाही. पायरी १०. जिल्हा पातळीवरील समितीने प्रस्तावित प्रकरणांची तपासणी करणे व सर्व अपील प्रकरणांचा विचार करणे | जिल्हा स्तरीय समिती स्तरावर पुढीलप्रमाणे समितीचे सभेचे रजिस्टर ठेवावयाचे आहेः तक्ता : जिल्हास्तरीय समितीच्या सभेचे रजिस्टर (वन हक्कांची मान्यता अधिनियम, २००६ अन्वये) जिल्हा -------- सभेचा | सभेचे । | सभेसाठी दिनांक । | ठिकाण | काढलेल्या व वेळ सूचनांचे तपशील, (क्रमांक, दिनांक व कोणास दिली) सभेस । सभेचा विचारार्थ उपस्थित | विषय, ( हक्क घेतलेल्या असलेल्यांची । मागण्या/ | प्रत्येक दावा/ नावे, पदनाम | अर्जाची । अर्ज यावरील व सही यादी द्यावी.) | समितीचा निर्णय