पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/344

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येईनात. हजार रुपये लिटर दराने कीटकनरशके खरीदून सरहद्दीवर लढणाऱ्या जवानांच्या शर्थाने शेतकऱ्यांनी त्यांच्याशी मुकाबला केला. काहींनी वीसवीस फवारण्या केल्या; पण किडींनी दाद दिली नाही. पिकाचे नुकसान झाले. भाडेपट्टीने घेतलेल्या जमिनीची पट्टी आता द्यावी कोठून ? लक्ष्मीचे दागिने सोडवून आणण्याचा तर प्रश्नच नाही. बायकोचे दागिने गमावणे यापेक्षा पुरुषाला नामुष्कीची गोष्ट ती कोणती ? जीव देऊन सुटणे हा एकच मार्ग. जीव देण्याचा एकतरी फायदा या कुटुंबातील लोक जीवापेक्षा प्रतिष्ठा महत्त्वाची मानतात अशी कीर्ती होते. त्यामुळे. जमिनीचे मालक मृताच्या कुटुंबातील कोणाला पुढच्या वर्षी पुन्हा जमीन भाडेपट्ट्याने द्यायला तयार होतात. बारा मृतांपैकी फक्त एकच स्त्री होती. कुटुंबप्रमुख असल्याने तिची गत पुरुषांसारखीच झाली. सरकारने काही थातुरमातुर रक्कम कुटुंबांच्या सांत्वनार्थ दिली होती.
 'यापुढे तुम्ही काय करणार ? प्रश्न मी प्रत्येक कुटुंबाला विचारला. सगळ्यांचे उत्तर एकच 'दुसरे काय ? कापूस शेतीखेरीज आम्हाला पर्यायच काय आहे?'
 यंदा हा आकडा दशकातला नाही; तीनशेच्या वरचा आहे. फरक केवळ अंशात्मक नाही, गुणात्मक आहे. इतके शेतकरी जीव का देतात? त्यात सर्वात जास्त प्रमाण आंध्र प्रदेशचे का? आणि कापूस किंवा तूर पिकविणाऱ्यांचे का? हरियाणातील गव्हाचे पीक यंदाच्या गैररमौसमी पावसाने ४०पैसे बुडाल्याची बातमी आहे; पण कोणी हरयाणवी जाट शेतकऱ्याने जीव दिल्याची बातमी नाही. या साऱ्या आत्महत्यांचे अर्थशास्त्र काय आणि त्यांची समाजशास्त्रीय उपपत्ती काय?

 गैरमौसमी पावसाने यंदा देशातील साऱ्याच राज्यांत हाहाकार उडविला. नोव्हेंबर महिन्यात २० दिवस पाऊस आणि डिसेंबर महिन्यात २४ दिवस पाऊस आणि गारा यांचा मारा! अगदी म्हाताऱ्यातील म्हाताऱ्या शेतकऱ्यालादेखील असे पूर्वी कधी घडल्याचे स्मरणात नाही. सोयाबीन, ज्वारी, कापूस आणि तूर यांचे सर्वदूर भयानक नुकसान झाले. पंजाबातील कोरडवाहू प्रदेशात गव्हाचे पीक फारसे येत नाही, तेथे यंदा भरभरून पीक आले आणि मोठ्या प्रमाणात गहू पिकविणाऱ्या जिल्ह्यांत पीकबूड झाली. या पावसाने उसाच्या पिकाचा मोठा फायदा झाला आहे. येत्या हगामात ऊसउत्पादकांना अमाप पिकाचा झटका वसणार आहे. बहुतेक साऱ्या शेतकऱ्यांवर संकट आजच येऊन कोसळले आहे.

बळिचे राज्य येणार आहे / ३४६