Jump to content

पान:बलसागर (Balsagar).pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संघाला वर्ज्य नाहीत; पण आग्रह आहे, अट्टाहास आहे तो गेली पाच हजार वर्षे अखंडपणे वाहत आलेला राष्ट्रजीवनाचा प्रवाह असाच पुढे वाहत-वाढवत नेण्याचा, अधिक खोल व रुंद करण्याचा. या प्रवाहात आता मुसलमान सामील होऊ इच्छित आहेत...आनंद आहे. त्यांनी सामील व्हावे असा आवर्जुन प्रयत्न करण्याचीही निकड आहे. 'याल तर तुमच्यासह' हा सावरकरी बाणा सारखा उपयोगी नाही. चाळीस वर्षापुर्वी तो आवश्यक होता. आता परिस्थिती बदलली आहे, संदर्भ नवीन आहेत, म्हणून अखंड भारताचे आपले ध्येय न सोडता संघाने मुस्लिमांना आपली द्वारे खुली केली. कारण गेलेले प्रदेशही पुन्हा जोडले जायचे, एकत्र यायचे, तर तत्पूर्वी मने जुळली पाहिजेत; मते, उपासनापद्धती वेगळ्या राहिल्या तरी 'संस्कार' एक हवा-अखंड राष्ट्रजीवनाचा. केमाल पाशा जसे, 'प्रथम मी तुर्की, मग मुसलमान' असे म्हणत असे तसे येथील मुसलमानांनीही म्हणायला शिकले पाहिजे; म्हणजे अखंड भारत अस्तित्वात आल्यासारखाच आहे. त्यासाठी वेगळी चाल करून जायची वगैरे काही आवश्यकताच उरणार नाही. अलिगढ प्रवृत्तीच्या नेमक्या विरुद्ध दिशेचा हा प्रवास आहे. पण मुस्लिम समाजाला तो केल्याशिवाय गत्यंतर नाही. संघाच्या मदतीने तो सुकर होईल एवढेच. हा प्रवास सुकर व्हावा म्हणून देवरसांचा संघ प्रयत्नपूर्वक काही नवे पूल बांधत आहे, परस्पर सामंजस्याचे वातावरण त्यामुळे निर्माण होऊ शकते. संघाने एक पुढचे पाऊल टाकले आहे. मुसलमानांनाही आपली पाऊले आता नीट जुळवून घ्यावी लागतील. अशी मने आणि पावले नीट जुळत गेली तर शक्यता आहे, अलग झालेले प्रदेशही पुन्हा एकत्र येतील, सिंधू आणि गंगा यांचे मीलन होईल, सावरकरांचे-गाधींचे भंगलेले स्वप्न पुन्हा साकार होईल. मार्ग अर्थातच वेगळे असतील. त्या वेळी मुसलमानांना वगळूनच विचार करणे भाग होते. आता त्यांना बरोबर घेऊन जावे लागणार आहे. त्यांनाच का? दूरदूर चाललेल्या आमच्या दलितबांधवांनासुद्धा ! त्यावेळी हे दोन्ही गट बरोबर नव्हते म्हणून फाळणी नामुष्कीने, नाइलाजाने पत्करावी लागली. हे इतिहासाचे काळ पान पुन्हा सोनेरी करावयाचे असेल तर डाव्या-उजव्या बाजूला हे दोन्ही गट हवेतच. किंबहुना त्याशिवाय अखंड भारताच्या स्वप्नाला अर्थच उरणार नाही. या दोन्ही गटांच्या सुरक्षिततेचाही हाच एकमेव व उत्तम उपाय आहे. मूळ प्रवाहापासून दूर फटकून राहणे हे असुरक्षिततेचे-मागासलेपणाचे मुख्य कारण आहे. या प्रवाहाचे आजवरचे नाव 'हिंदू' आहे म्हणून बिचकून जाण्याचेही कारण नाही. उद्याचे नाव प्रवाहातूनच वर येईल. त्याची चिंता आज कशाला? आसिंधू सिंधू भारताला जे आपली केवळ पितृभ आणि पुण्यभूच मानतात असे नाही, तर मातभू आणि भ्रातृभूही मानतात ते सगळेच हिंदू आहेत, भारतीय आहेत, आणि बंधुभावाने राहू इच्छिणाऱ्या सर्वांचे 'अखंड भारत

।। बलसागर ।। १४४