पान:बलसागर (Balsagar).pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 

 दंगली केव्हा थांबतील ?

 

 शनिवारी, तीन जुलैला (कराडजवळील) ओगलेवाडी येथे झालेल्या दंगलीत 'हिंदू एकता आंदोलन' कार्यकर्त्यांचा हात होता असा आरोप सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बी. एस. मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना केलेला आहे. (प्रेस ट्रस्ट वार्ता)

 श्री. मोहिते यांनी असेही सांगितले की, दोन वर्षांपूर्वी हिंदू एकता आंदोलन कार्यकर्त्यांनी ओगलेवाडी येथील एका प्रार्थनास्थळाच्या बांधकामास विरोध केला होता. ३ जुलैला घडलेल्या घटनांमागे हे कारण होते.


 नुकतीच बिहारमध्ये एक हिंदू-मुस्लिम दंगल उसळली. पाटण्याजवळील फुलवारी शरीफ येथे. अशोक सिंग नामक एका पत्रकाराचा या दंगलीसंबंधी एक प्रदीर्घ लेख संडे ऑब्झर्व्हर या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला आहे. (दि. ४ जुलै) या लेखावरून तरी सिंग हे ऑब्झर्व्हरमधील लेखकांप्रमाणेच रा. स्व. संघ/हिंदुत्वविरोधीच दिसतात. तरी या सिंगांनी या लेखात एके ठिकाणी म्हटले आहे -

 "The most important factor to have triggered off communlism, a factor most hotly debated, concerns an acre of land in the heart of the township and its allotment to the Imarat - e - sharia.”

 "इमारत-ए-शरियाला शहराच्या मध्यवस्तीतील सुमारे एकरभर जागा

।। बलसागर ।। १०१