Jump to content

पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीरावांच्या नात इंदुमती देवी व कोल्हापूरचे राजाराम
 महाराज यांच्या विवाहावेळी महाराजांनी गणपतराव गायकवाड व नानासाहेब यांच्याकडे वधू पक्षाकडील सर्व व्यवस्था पाहण्याची जबाबदारी सोपवली होती. तर राजपुत्र धैर्यशीलरावांच्या विवाहाप्रसंगी मुख्य विवाह समितीमध्ये सयाजीरावांनी नानासाहेबांची नेमणूक केली, तर राजकन्या लक्ष्मीदेवींच्या विवाहाला धारचे महाराज हे सावंतवाडीच्या राजांचे मेहुणे या नात्याने हजर होते. धारच्या महाराजांची आणि नानासाहेबांची जुनी ओळख असल्यामुळे त्यांनी नानासाहेबांना स्वतःच्या कॅम्पची व्यवस्था पाहण्यासाठी मुद्दाम मागून घेतले. 'दिलदार' शाहू महाराज २५ मे १९१८ रोजी नानासाहेबांची मुलगी शांताबाई हिचा सांगली जिल्ह्यातील डिग्रज येथील उदाजीराव चव्हाण यांचे तृतीय चिरंजीव जीवराव ऊर्फ तात्यासाहेब यांच्याशी कोल्हापूर येथे झाला. या विवाहाची आठवण नोंदवताना नानासाहेब आपल्या आत्मचरित्रात लिहितात, “लग्नसमारंभास कोल्हापूरचे श्री. शाहू छत्रपती महाराज साहेब व महाराणी साहेब व इतर सरदार मंडळी आली होती. आमचे वऱ्हाड इचलकरंजीकरांच्या बंगल्यात उतरले होते.
 कोल्हापुरात होणाऱ्या लग्नास महाराज साहेब कधीही वेळेवर येत नाहीत, असा बहुतेक रिवाजच पडलेला होता; परंतु या लग्नास महाराज साहेब ठरलेल्या वेळेस आले व बहुल्याजवळ

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ३९