पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पैसे असे खेळतात..... सखुबाईकडं १० रुपयाची नोट होती. तिला पाहुण्यांसाठी सरबत करायचं होतं. १० रुपयाची नोट देऊन पारुकडनं तिनं ४ लिबं खरेदी केली. पारुनं तिच १० रुपयाची नोट भिमाला दिली आणि दळण घेऊन आली. भिमेचं झंपर राधाकडं शिवायला दिलं होतं. तेच १० रुपये तिनं राधाला दिले आणि झंपर घेतलं. राधाने ते १० रुपये चहासाठी साखर आणायला वापरले तेव्हा ते दुकानदार सुजाताकडे गेले. म्हणजे बघा, १० रुपयाची नोट एकच होती, पण त्यातनं सखु, पारु, भिमा, राधा अशा ४ जणींची खरेदी झाली. आणि सुजाताकडं १० रुपये जमा झाले. नोट फिरत राहिल्यामुळे ४० रुपयांची गरज भागली आणि १० रुपयाची नोट हाताशी शिल्लक राहिली. १० रुपयाची नोट फिरत राहिल्यामुळे पुढेही अनेक जणींची गरज भागवेल. यालाच म्हणायचे पैसे खेळते राहणे. आपापसात व्यवहार करण्याचा हाच उपयोग असतो . बचत गटाच्या व्यवहारामुळंही अगदी असंच होतं! गरज अनेकींची भागते आणि पैसे गटातच राहतात. भारतीय रिजर्व बैंक 3T1821865 IMESERVEDANKOR INDIAT केरतीय सरकार द्वारा पत्यान GARAUNTRicinnaconABAR And FES चहा साखर ज्ञान प्रबोधिनी ग्राम विकसन विभाग ५१०, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३० (०२०) २४४९ १९५७, २४२० ७०००,२४२०७१६२