पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशिक्षकासाठी टिपण – गटप्रमुख प्रशिक्षण ५ स्पर्धा कशी घ्यावी स्पर्धा १ कॅलक्युलेटरने बेरीज करा सूचना : कॅलक्युलेटर कसा वापरावा ते शिकवा. १. आकडा दाबा. २. स्क्रीनवर बघा. ३. '+' दाबा मग बेरीज होते असं सांगा. ४. जे चिन्ह दाबू ती क्रिया होते. ' -'(वजा) दाबल्यास वजाबाकी होते. दाबल्यास भागाकार होतो _ 'x' दाबल्यास गुणाकार होतो इ. तोंडी सांगावे. ५. आकडा दाबल्यावर स्क्रीनवर दिसतो, तो तपासायचा म्हणजे चूक होत नाही. ६. जर चुकलं तर कसं खोडायचं ते शिकवा. पूर्णपणे खोडायचं असेल तर CE हे बटण दाबावे. फक्त शेवटचा आकडा नको असेल तर 'C' हे बटण दाबावे. हे करून दाखवा. उदा : २+४+ ७ = करा २ + ४ दाबल्यावर पुन्हा '+' दाबल्यावर स्क्रीनवर ६ हा आकडा दिसेल म्हणजे बेरीज होईल. मग पुढील बेरजेसाठी ७ दाबायचा आहे. शिकण्यासाठी ७ ऐवजी ७७ दाबा मग 'C' दाबा '=' दाबल्यावर पुन्हा ६ येईल, मग ७ दाबायचा '=' केल्यावर १३ आकडा दिसेल म्हणजे बेरीज होईल, असे करायला सांगावे. म्हणजे चूक कशी दुरुस्त करायची ते कळेल. सरावासाठी त्यांना खालील बेरजा करायला सांगा. सराव : २५+१००+१२= २५ +१००+२१= ५० +१००+६२= सूचना : मराठी १हा इंग्रजी 9 सारखा वाटतो तर इंग्रजी 9 हा मराठी ७ सारखा वाटतो,यात गोंधळ होतो . इंग्रजीत 4, 8 कधी कधी वाचता येत नाही. म्हणून फळ्यावर मराठी आकड्यासमोर इंग्रजी आकडे काढावेत. ★★★★★