पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशिक्षकासाठी टिपण – गटप्रमुख प्रशिक्षण ३
पुढील पानावरील व्याजाचे टेबल त्यांना द्यावे, ते वाचायला शिकवावे. त्यानंतर ११ ते १५ उदाहरणांचे व्याज, टेबल वापरुन काढायला सांगावे. टेबल वापरल्यामुळे व्याज पटकन काढता येते हे लक्षात येऊ दे. असे झाल्यावर प्रमुखांचा गट घेण्याचा विश्वास वाढेल.
येणे बाकी व्याज ३५० रु. ९२० रु. १९ १,५०० रु. ३० २,७९० रु. ११,०२० रु. २२१

★★★★★
सेवाशुल्क दर तक्ता

पुढील पानावर दिलेल्या सेवाशुल्क दर तक्त्यात अर्थसाहाय्य येणे बाकी वर २% दराने सेवाशुल्क किती येईल याची उत्तरे दिली आहेत. हा तक्ता कसा वाचायचा ते गटप्रमुखांना शिकवावे. अनेकदा गणित येत असूनसुद्धा घाईमुळे, दडपणामुळे, अनवधानामुळे गटप्रमुखांच्या हातून सेवाशुल्क काढताना चुका होतात. त्या चुका होणं टाळण्यासाठी या तक्त्याचा वापर करावा. इथे ५० रुपयाच्या पुढे १ असे दिले आहे याचा अर्थ रु. १ ते ५० या रकमेपैकी कितीही पैसे येणे बाकी असतील तर सेवाशुल्क दरमहा २% दराने १ रु. द्यावे. जर येणे बाकी ५१ ते १०० असेल तर रु. २/- सेवाशुल्क होईल. या तक्त्यात १०,००० रु. अर्थसाहाय्य असेल तर सेवाशुल्क रू. २०० होईपर्यंत आकडेवारी दिली आहे. गटाचा अंतर्गत कर्जवाटप दर जर वेगळा असेल, उदा. ३% असेल, तर असा स्वतंत्र तक्ता करून गटप्रमुखांना द्यावा.