पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशिक्षकासाठी टिपण- गटप्रमुख प्रशिक्षण ३

सांगा पाहू व्याज काय ?

 प्रशिक्षणाच्या वेळी आर्थिक सेवा शुल्क कसे काढावे हे गट प्रमुखांना शिकवावे. सेवा शुल्क दर (व्याज) गटामध्ये महिन्याचा असतो तो शंभरावर. म्हणून व्याज काढताना आकडा 'शे' मध्ये वाचायला शिकवावा व त्या आकड्याला दराने गुणावे. अनुभवाने यायला लागले की आकडे हजारात म्हणायला हरकत नाही.
उदा : २८०० हा वाचताना दोन हजार आठशे ऐवजी अठ्ठावीस शे असे म्हणावे.
२८ x २ = ५६ असे व्याज काढायचे असे तोंडी सांगावे.
नमुना म्हणून ७०० चे ..... ७ x २ = १४
 असे फळ्यावर काढून दाखवावे. पुढील पानावरील गटप्रमुख प्रशिक्षण क्रमांक ३ सोडवताना वरीलप्रमाणे हिशोब करून १ ते ५ उदाहरणांतील व्याज काढायला सांगावे. साधारण १० मि. वेळ द्यावा. मग उत्तरे तपासावीत.
येणे बाकी व्याज १,३०० रु. २६ १,६०० रु. ३२ २,१०० रु. ४२ १०,००० रु. २०० १५,२०० रु. ३०४  मग कर्ज ५० रुपयांपेक्षा कमी असेल तर १ रु. व्याज व कर्ज ५० रु.पेक्षा जास्त असेल तर २ रुपये व्याज हे सांगावे. त्यानंतर ६ ते १० उदाहरणांचे व्याज काढायला सांगावे. मग उत्तरे तपासावीत. म्हणजे जर येणे बाकी ५०० ते ५५० असेल तर व्याज ११ द्यायचे पण ५५० पेक्षा एका रुपयाने जरी जास्त असले म्हणजे ५५१ ते ६०० मध्ये असेल तर व्याज १२ द्यायचे.
येणे बाकी व्याज ५८०रु. १२ १४४० रु. २९ १०७०रु. २२ ८८५४ रु. १७८ १२२५० रु. २४५ ११ ते १५ उदाहरणांची उत्तरे पान २८ वर बघावीत.