पान:फुलाचा प्रयोग.djvu/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फु ला ला फा शी ची शि क्षा

  • * * * * * * * *

एके दिवशी फुला नित्याप्रमाणे आपल्या प्रयोगालयात काम करीत होता. इतक्यात गावात टापटीप असे घोड्यांचे

आवाज घुमू लागले. एक, दोन, तीन किती हे घोडेस्वार ! खंद्या घोड्यांवर शिपाई बसलेले होते. त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रे होती. ते धिप्पाड होते. क्रूर दिसत होते. गावातील लोक घाबरले. घरांच्या दारांतून ते डोकावून बघत होते. का आले हे घोडेस्वार ? काय पाहिजे त्यांना ?
घोडेस्वारांनी फुलाच्या घराला गराडा दिला. काही बाहेर उभे राहिले. काही घोड्यांवरून उतरून घरात घुसले. घरात आत्याबाई काम करीत होती. ते शिपाई धाडधाड जिना चढून वर जाऊ लागले.
 "अरे, काय पाहिजे तुम्हाला ? मला सांगा. त्यांच्या प्रयोगात नका त्रास देऊ. तो रागावेल हो. अरे वर कोठे चाललेत ? असे ताडताड काय जाता ? " ती म्हातारी आत्या बोलू लागली.
 "ए बुढ्ये, गप्प बस त्या कोपऱ्यात. त्या कोपऱ्यातून हाललीस तर बघ. वटवट बंद कर." एक घोडेस्वार म्हणाला.
 ते घोडेस्वार वर गेले. ते काचेच्या घरात गेले. त्यांच्या बुटांच्या जोरदार पावलांनी त्या काचा हादरल्या, थरथरल्या. फुला प्रयोगात तन्मय झाला होता. एकदम सभोवती त्याला छाया दिसल्या. त्याने वर पाहिले तो क्रूर शिपाई उभे.
 "काय पाहिजे तुम्हाला ? " त्याने शांतपणे विचारले.
 " मोठा साळसूद. त्या देशद्रोही प्रधानांचे कागदपत्र तुझ्याजवळ आहेत की नाही ? बन्या बोलाने सांग. ते कागदपत्र दे. ऊठ. असा बघतोस काय

फुलाला फाशीची शिक्षा * १५