पान:फुलाचा प्रयोग.djvu/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पापी आहे. परंतु आईंचा आधार असू दे. भाऊलाही तिथेच दिलेला आहे. आईच्या कडेला मला अग्नी द्या. आणखी एक सांगते. गावाबाहेर ती नदी आहे ना ? तिच्या तीरातीराने बघत जा. कोठे तरी लव्हाळ्यात सापडेल. माझे बाळ सापडेल जन्मताच ते भी सोडून दिले. नदीच्या स्वाधीन केले. तरी सापडेल. सापडेल त्याचा सांगाडा. त्याला आणा आणि माझ्या स्तनांवर त्याला ठेवा. त्याला एकदासुद्धा नाही हो पाजले. स्तन भरून येत. परंतु बाळ कोठे होता ? आणा हो त्याला शोधून आणि माझ्या जवळ ठेवून, माझ्या स्तनाशी त्याला ठेवून, दोघांनाही एकदमच अग्नी द्या.हे काय, रडायला लागलेत वाटते ? कर्म करताना हसावे, मग रडावे. परंतु डोळे पुसा, ऐका नीट. कर्तव्य कठोर असते. ते केलेच पाहिजे. कराल ना ? " मधुरी, असे का तू म्हणतेस ? तू मरणार नाहीस. तू वाचशील. आपण दोघे एकत्र राहू. सुखात नांदू. चल ऊठ. धर हात. वेळ नाही. नीघ. ". 66 नका अशी ओढू. मला मरू दे. कशाला आता जगायचे ? आणि समजा तुमच्याबरोबर आत्ये तर पुन्हा पकडतील. पुन्हा तीच शोभा. खरे ना ? " परंतु आपण लांब लांब जाऊ. दुसन्या देशात जाऊ. तेथे कोण येईल घरायला, कोण येईल पकडायला ? ऊठ. दुसऱ्या देशात ह्या देशातील पोलीस येणार नाहीत. त्यांचा ससेमिरा चुकेल. पण 48 पण काय ? ऊठ. (8 माझ्या हृदयातील सदसद्विवेकबुद्धीचा पोलीस कसा दूर होणार ? कोठे पाताळात गेल्ये तरी हे मनातील विचू दंश करीत राहाणारच. नको. आता जाणे नको. आता मरणेच श्रेयस्कर. पश्चात्ताप झाला आहे. मरणाने मी मुक्त होईन ! प्रभू मला जवळ घेईल, मी तुमची तेथे वाट बघत बसेन. माझ्या पश्चात्तापाने तुम्हीही पवित्र होऊन याल. तेथे भेटू. 66

66 मधुरी, ऊठ. " तो तिची बकोटी धरून म्हणाला. नको, खरेच नको. " ती म्हणाली. ती काळरात्र ८७