पान:फुलाचा प्रयोग.djvu/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" खरंच का ? " "( 'हो. साऱ्या गावात बभ्रा झाला आहे. "( का ग मधुरी, तुला आहे ना ती चिमणी माहीत ? " हो. आहे. ती का गेली ? 44 " “हो. आईबाप घरात आहेत. त्यांच्या नावाला काळिमा. अलीकडच्या मुली फारच हो आगोचर वागू लागल्या एकूण. " जे जे ऐकावे ते ते थोडेच. " त्या बायका गेल्या. मधुरी घागर घेऊन तेथेच उभी होती. घागर भरलेली होती. डोळ्यांच्या घागरीही भरून आल्या. चिमणीवर होणाऱ्या टीकेत तिनेही भाग घेतला. परंतु तिला काय अधिकार ? ती चिमणी- सारखीच नव्हती का ? तो चिमणी तर ही मैना काय होता फरक ? मधुरीचे मन तिला खात होते. शेवटी घागर घेऊन ती घरी आली. दारे लावून ती रडत बसली. • मधुरोची आई गेली, भाऊ गेला. परंतु प्रियकर होता. परंतु तो बरेच दिवसांत डोकावला नाही. तोही का सोडून गेला ? त्याने का फसविले ? प्रेम म्हणजे क्षणभर शरीराची करमणूक असे का त्याला वाटले ? नाही, असे तो करणार नाही. येईल, तो येईल. कसा दिसे, कसा हसे, कसे त्याचे चालणे, कसे बोलणे. येईल माझा राजा, येईल माझ्या प्राणांचा प्राण. अशा आशेने मधुरो जगत होती. तो चरखा चालवी. तोंडाने गाणे म्हणे. प्रियकराच्या वर्णनाचे गाणे. प्रियकराच्या प्रेमाचे गाणे. चरखा गुं गूं करी. तिच्या गाण्याला साथ देई. " येईल. गुं गूं. येईल. प्रियकर येईल. गुं गूं. " असे जणू तो चरखाही बोले. 66 Oe दिवसामागून दिवस चालले. मधुरी वाट पाहात होती. दिवसा ती दारे लावी. रात्र झाली, मध्यरात्र झालो, को उघडी टाकी. तो दिवसा यायला लाजत असेल. रात्रो येईल. दारे उघडो असू देत. परंतु तो आला नाही. कोडे गेला तो ? तो का फसवील ? मला सोडून जाईल ? नाही. तो असे करणार नाही. तो माझ्याजवळ लग्न लावोल. माझो अब्रू सांभाळील. मला प्रेम देईल. येईल. तो खात्रीने येईल. तो खात्रीने येईल. दुःखीकष्टो मधुरी. किती फिक्कट दिसते, परंतु आशेने आहे. ८२ % फुलाचा प्रयोग