Jump to content

पान:फुलाचा प्रयोग.djvu/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रे बोलतोस ? नाही आमचे अद्याप लग्न झाले. परंतु ते लावणार आहेत. त्यांचे प्रेम आहे माझ्यावर. माझे त्यांच्यावर निमळ प्रेम म्हणजे का व्यभिचार ? म्हणजे का वेश्याव्यवसाय ? भाऊ, कसे रे बोलतोस असे ? का अशी आग पाखडतोस ? कोण आहे मला ?”
 " तू दूर हो सांगितले ना ? माझ्याजवळ प्रमाचे वर्णन करतेस, लाज नाही वाटत ? लग्न म्हण लागेल. लागल्यावर मारायच्या होत्यास मिठ्या.परंतु आधीच ? पापिणी, चांडाळणी, दूर हो. हात नको लावू मला.धर्मंबुडवी. कुळाला काळिमा लावलास. घराची अब्रू दवडलीस. मला गिरणीत मान वर करू देत नाहीत. परंतु तुझी बाजू घेऊन मी भांडत असे. माझी बहीण निर्मळ म्हणत असे. परंतु तू तर नरकात बुडथा मारीत आहेस. नाच आता पोटभर त्या नरकात. आईची अडगळ गेली. भावाची अडचणही दूर झाली. दाही दिशा तुला मोकळ्या दूर हो. हो दूर."
 " भाऊ, असेन मी पापी. असेन मी कुलटा. पाप्यावर प्रेम करील तोच खरा. चांगल्यावर सारेच प्रेम करतील. खरे प्रेम ते जे पाप्यावरही दया करील. भाऊ, सारे जग दूर लोटील. परंतु तू नाही लोटता कामा तू माझे अपराध पोटात घातल पाहिजेस. तुझे प्रेम असे मोठे नाही ? ते प्रेम का संकुचित, क्षुद्र आहे ? बहिणीची सारी पापे विसरून जाण्याइतके तुझे प्रेम सहनशील नाही ? भाऊ, ते मोठे प्रेम मला दे. मला कोणी नाही."
 " तुझा प्रियकर आहे. काय करायचा भाऊ, काय करायची आई ? भी आता थोडाच बाचणार आहे ? शक्ती संपत आली. झापड आली डोळ्यांवर. एकच तुझ्याजवळ मागणे. मरताना मला हात नको लावू. तुझा स्पर्श नको. कुळाला काडी लावणारी तू. हो माझ्या डोळ्यांआड, हो दूर."
 मधुरी दूर झाली. ती बाजूला रडत बसली. परंतु तिला आता रडूही येईना. ती केवळ शून्य दृष्टीने बघत होती. शेवटी भावाने प्राण सोडले. मधुरी जगात एकटी राहिली.
 काही दिवस मधुरी घरातून बाहेर पडली नाही. विहिरीवरून पाणी आणण्यासाठी हळूच एकटी जाई. जगाचे दर्शन नको असे तिला वाटे. ती रडत बसे. एके दिवशी ती विहिरीवर गेली तो तेथे बायका बोलत होत्या.
 " ऐकलंत का ? ती चिमणी म्हणे पळून गेली."

गो-गो-४....६

दुःखी मधुरी ८१