पान:फुलाचा प्रयोग.djvu/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(4 पड आता. झोप लागेल. ” मधुरी म्हणाली. " तूही पड. दिवसभर तुला काम करावे लागते. धुणी धुवावो लागतात. दळण दळावे लागते. नीज हो मधू, ये." आई प्रेमाने म्हणाली. आईला झोप केव्हा लागते ह्याची वाट पाहात मधुरी अंथरुणावर पडली. थोड्या वेळाने आई खरोखरच घोरू लागली. भाऊही घोरत होता. -मधुरी हळूच उठली. तिने दाराची कडी अलगत काढली. तो बाहेर पडलो. - आपल्या प्रियकराला भेटायला गेली. अद्याप कोंबडा आरवला नव्हता. कोण घेत आहे ते काळोखातून ? मधुरी. ती मधुरी आहे. ती हळूच घरात शिरली. तिने कडी लावली. डोक्यावरून पांघरूण घेऊन ती निजली, परंतु तिला झोप आली का ! भोंगा झाला. भाऊ उठला. आई घोरत होती. आईला आज झोप • लागली आहे हे पाहून भावाला बरे वाटले. त्याने प्रातविधी केले. स्नान करून तो कामाला गेला. आता चांगलेच उजाडले. घ घरात उन्हे आली. -मधुरीलाही झोप लागली होती. परंतु ती जागी झाली. ती उठली. आई अद्याप अंथरुणातच होती. परंतु आता धारणे बंद होते. मधुरीने तोंडबिड धुतले. ती आईजवळ गेली. आईचा हात तिने हातात घेतला. तो तो थंडगार लागला. मधुरी घाबरली. आई, आई, तिने हाका मारल्या. • आईला शुद्ध ना बुद्ध सारी हालचाल थांबली होती. आई का मेलो ? तो विचार मधुरीच्या मनात आला. तो दचकली. तिने किंकाळी फोडली. शेजारचे लोक आले. → 'मेली म्हातारी. मिटला खोकला. " ते म्हणाले. आता आम्हाला झोप येत जाईल. म्हातारीचा खोकला साया • आळीला झोपू देत नसे. देवाला दया आली. " एक दुष्ट म्हणाला. मधुरीची आता मजा आहे. " कोणीतरी हसून 'बोलले.

मधुरीच्या आईची सारी क्रिया झाली. भाऊ व बहीण दोघे राहिली. ● एके दिवशी मधुरीचा भाऊ कामावरून येत होता. इतर कामगारांजवळ जवळ त्याचा वाद चालला होता. दुःखी मधुरी * ७९