पान:फुलाचा प्रयोग.djvu/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
" तुला ज्याची जरूर आहे तोच मी."

 " मी अकर्ता आहे. मी केवळ साक्षी आहे. देणे-घेणे माझे काम नाही. दिवस-रात्र, सुख-दुःख, जीवन-मरण ह्यांचा विराट खेळ मी पाहात असतो. एवढेच माझे काम."
 " तुझी मला जरूर नाही. कशाला आलास माझ्यासमोर ? नीघ येथून. कर काळे ! ” रागाने माधव म्हणाला.
 ती व्यक्ती अंतर्धान पावली. माधव पुन्हा काही मंत्र पुटपुटू लागला. तेलचूल त्याने जोराने पेटविली. हिरव्या-निळ्या ज्वाला सो सो करीत होत्या. त्या कोपऱ्यातील कुत्र्याकडे पाहा. हळू हळू त्याच्यातून एक मनुष्य बाहेर पडत आहे. ते पाहा मोठे डोके, ते पाहा हात, ती छाती, ते पाय. तो पाहा लांब अंगरखा व डोक्याला रुबाबदार फेटा. ती पाहा हातात भली भक्कम काठी. ते पाहा पायात जोडे. कशी भव्य आहे आकृती ! ती आकृती माधवासमोर उभी राहिली. " कोण तू ? " माधवाने प्रश्न केला.

सैतानाशी करार * ६३