पान:फुलाचा प्रयोग.djvu/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " कळ्ये, तो गृहस्थ आपल्याच झाडाशी बराच वेळ उभा आहे. मला भीती वाटते. ह्या माणसाचा संशय येतो. कदाचित् त्या फुलाझाडाला तो उपटून नेईल किंवा त्याच्या नाश करील. तू असे कर, उद्या हळूच ते झाड खणून काढ. मुळांना धक्का नको लावू. नंतर तू ते झाड स्वतःच्या खोलीत एका मोठ्या कुंडीत लाव. खोलीला कुलूप लावून ठेव."
 " बरे.तुम्ही सांगता तसे मी उद्या करीन. "
 " दुसऱ्या दिवशी कळो उजाडत बागेत गेली. हलक्या हातांनी ती खणीत होती. परंतु चुकून घाव मुळावर पडला. ती कोवळी मुळे तुटली. झाड मेले. ते कसे जगणार ? ती रडू लागली. तिने वर पाहिले. ते डोळे तिच्याकडे बघत होते. ' रडू नको' अशी त्याने खूण केली."
 तो मुशाफर हिंडत तेथे आला, तो ते झाड नाही. आपल्यावर कोणाची तरी पाळत आहे अशी त्याला शंका आली. त्याने वर पाहिले, तो गजांतून फुला क्रोधाने त्याच्याकडे बघत होता. फुलाला पाहाताच पाहुणा काळवंडला. तो एकदम बगीच्यातून निघून गेला.
 कळीच्या हालचालींवर तो पाहुणा पाळत ठेवू लागला. दुपारी कळी फुलाच्या खोलीकडे चालली. पाठोपाठ हळूच तो पाहुणा गेला. तो जिन्यात लपून त्यांचे म्हणणे ऐकत होता.

तो जिन्यात लपून त्यांचे म्हणणे ऐकत होता.

तुरुंगातील प्रयोग ३९