पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भारतीयज्योतिःशास्त्रः - (प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास.) उपोद्धात. शरदक्रतूंतील किंवा हेमंतातूंतील एकाया रात्री मैदानांत किंवा घराबाहेर उघड्या जागेवर बसलें असतां सहज आकाशाकडे लक्ष्य जाते. चोहोकडे हजारों तारा चमकत असतात. कांही फार बारीक दिसतात, काही मोठ्या दिसतात. अंमळ लक्ष्य लावून पाहत बसलें तर त्या स्थिर नाहीत असें दिसूं लागते. कांही एका बाजूस खालून वर येत असतात, कांहीं दुसऱ्या बाजूस खाली जात असतात. पाहतां पाहतां एकादी मोठी आणि विशेष चमकदार तारा उगवते. तिच्याकडे चमत्कारपूर्वक पहात असावें, इतक्यांत एका बाजून जमिनीशी लागलेल्या आकाशाच्या भागी उखलखीत उजेड दिसूं लागून तिकडे आपलें चित्त वेधतें. तो उजेड जास्त जास्त दिसूं लागतो. त्या बाजूच्या तारांचें तेज कमी होत जाते. थोड्याच वेळाने किंचित् आरक्त असें चंद्रबिंब दिसूं लागते, ते पाहून तर फारच आनंद होतो. तें जसजसें वर येते तसतसें बन्याच तारांस लोपवून आपलें आनंददायक तेज पृथ्वीवर पसरतें. याप्रमाणे आपण आनंदांत असतांच अकस्मात् लखकन उजेड पडून एकादी तारा आकाशांतून तुटलीशी वाटते. एकादे वेळी थोड्याच वेळांत अशा लहानमोठ्या दहापांच तारा तुटल्याशा दिसतात. हे पाहून आपले मन दचकून जाते. . अशा प्रकारच्या स्वाभाविक चमत्कारांकडे मनुष्याचें लक्ष्य सहज लागते. त्यांत पृथ्वीवरील चमत्कारांपेक्षां आकाशांतील चमत्कार स्वाभाविकच जास्त भव्य व मनोवेधक असल्यामुळे त्यांजकडे जास्त लक्ष्य जाते. कोणत्याही कारणाने अनेक प्रकारच्या प्रापंचिक व्यवहारांकडे ज्यांचे लक्ष्य कमी अशा लोकांचे लक्ष्य आकाशांतील चमत्कारांकडे लागण्याचा जास्त संभव आहे. मुद्दाम या गोष्टीकडे नेहमी लक्ष्य देणारे सोडून द्या, परंतु बाकी एकंदर जनसमूहाकडे पाहिले असतां, रात्रीच्या प्रहरी गुरेंमेंढरें राखण्याकरितां रानांत किंवा उघड्या जागेवर राहणारे धनगर वगैरे लोक, पहांटेस लवकर उठून शेतकीची वगैरे काम करूं लागणारे कुणबी वगैरे लोक, साधारणतः नक्षत्रांच्या खुणांवरूनच दिशा ओळखून रात्रीच्या वेळी समुद्रांत गलबतें चालविणारे आपले कोळी वगैरे खलाशीलोक, ह्यांस इतरांपेक्षां नक्षत्रांची माहिती बरीच असते. इतरांस थोडीबहुत असतेच. ज्यांस आकाशांतील माहिती कांहींच नाही अशी मनुष्ये आपल्या देशांत थोडी सांपडतील. .