पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७९) पंचाशत्पलमाढकमनेन मिनुयाज्जलं पतितं ॥३॥ हे लिहितांना वेदांगज्योतिषाचा हाच श्लोक त्याच्या डोळ्यांपुढे असावा असे दिसते. परंतु वराहमिहिरानेही पुढील श्लोकांत द्रोण शब्दाचा उपयोग केला आहे, तरी आढक आणि द्रोण यांचा परस्पर संबंध सांगितला नाही. वरील आर्येचे चारही चरण होऊन गेल्यामुळे ते सागण्यास त्यास सवड झाली नसावी. परंतु टीकाकार भटोत्पल ह्मणतो की, " यतः उक्तं-पंचाशत्पलमाढकं ॥ चतुर्भिराटकोणः" हे दोन श्लोकपाद वरील वेदांगज्योतिषश्लोकांतील दुसन्या आणि तिसन्या पादांशी इतके जुळतात की ते उत्पलाने वेदांगज्योतिपांतलेच घेतले असें निःसंशय दिसते. भास्कराचार्यादिकांनीही ४ आठक मणजे द्रोण हे प्रमाण सांगितले आहे. ह्मणून भटोत्पलाने दिल्याप्रमाणे वेदांगज्योतिषाचा वरील श्लोक पुढे लिहिल्याप्रमाणे पाहिजे, आणि तोच पूर्वापरसंगत आहे. नाडि के द्वे मुहूर्तस्तु पंचाशत्पलमाढकं ॥ चतुभिराढोणः कुटपैर्वर्धते विनिः ॥ १७॥ अर्थ-मुहूर्त मणजे दोन नाडिका. पन्नास पलांचा आढक. चार आढकांचा द्रोण. [हा नाडिकेहून ] तीन कुडवांनी जास्त आहे ।। १७॥ यांत " हा नाडि केहून " हे शब्द अध्याहृत व्यावे लागतात. पहिल्या पादांत नाडिका आली आहे तेव्हां ते घण्यास विशेष अडचण नाही. ते घेऊन जो अर्थ होतो तो यजुःपाठांत स्पष्ट आहे. तो श्लोक असा. पलानि पंचाशदपां धृतानि तदाढकं द्रोणमतः प्रमेयं ॥ विभिविहीनं कुडवैस्तु कार्य तन्नाडिकायास्त भवेत्प्रमाणं ॥ २४ ॥ अर्थ-पन्नास "पले वजन पाणी धरिलं ह्मणजे त्याला "आढक" ह्मणतात. त्यावरून एक 'द्रोण वजन पाणी मोजावें. त्यांत तीन कुडव पाणी वजा करून बाकी राहते तितके पाणी [ घटिका पात्राचे छिद्रावाटे येण्यास जो काल तें] नाडिकेचें मान होय. ह्या श्लोकांतील कुटप ( कुडव ) ह्या मापाचे मान समजले पाहिजे. तसेंच वर सातव्या श्लोकांत प्रस्थ हे मान कालमानाच्या संबंधेच आले आहे. त्याचा आणि नाडिकेचा संबंधही वेदांगज्योतिषांत आला नाही. तर याबद्दल विचार करूं. भास्कराचार्य ह्मणतो की द्रोणस्तु खार्याः खलु षोडशांशः स्यादाढको द्रोणचतुर्थभागः ॥ प्रस्थचतुर्थांश इहाढ कस्य प्रस्थांनिराद्यैः कडव. प्रदिष्टः ॥ ८॥ लीलावती. अर्थः-४ कुडव-प्रस्थ. ४ प्रस्थ-अढक. ४आढक-द्रोण. आणि वेदांगज्योतिषांतील श्लोकांवरून ५० पलें ह्मणजे आढक होतो. ह्या आ'धाराने पुढील माने निष्पन्न होतातः द्रोण-२०० पलें= ६५ कुडव. प्रस्थ=१२१ पलें. आढक=५० पलें. कुडव-३३ पलें. आणि वेदांग ज्योतिषाप्रमाणे द्रोणांत ३ कुडव वजा केले मगजे नाडिका होते. तेव्हा