पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यजुःपाठ घेऊन अर्थ लागतो: अर्थ-जेव्हां चंद्रसूर्य एकत्र वासव ( धनिष्ठा ) नक्षत्रों भात होऊन आकाशति आक्रमण करितात, तेव्हां युग, माघ [ मास ], तपस् [ऋतु] शुक्ल [पक्ष, आणि] उदगयन यांचा आरंभ होतो. ॥ ५॥ प्रपद्येत श्रविष्ठादौ सूर्याचांद्रमसावुदक ॥ सापाई दक्षिणार्कस्तु माघश्रावणयोः सदा ॥ ६ ॥ "चांद्रमसौ" येथें यजःपाठ“चंद्रमसौ" असा आहे आणि तोच शुद्ध आहे. अर्थ-श्रविष्ठांच्या आरंभी सूर्यचंद्र उत्तरेस वळतात. आणि आश्रेषांच्या अर्धावर दक्षिणेस [ वळतात ]. सूर्य सर्वदा माघ आणि श्रावण या [ मासां ] त [ अनुक्रमें उत्तरेस आणि दक्षिणेस वळतो.] ॥ ६ ॥ या अयनस्थितीचा काल ठरवितां येतो. त्यासंबंधे सविस्तर विवेचन शेवटीं केलें आहे. धर्मवृद्धिरपांप्रस्थः क्षपाहास उदन्गतौ ॥ दक्षिणेतौ विपर्यस्तो षण्मुहूर्त्ययनेन तु ॥ ७ ॥ अर्थ-[ सूर्याच्या] उदगयनामध्ये उदका एक प्रस्थ इतका दिवस वाढतो आणि रात्र लहान होते. दक्षिणायनांत उलट होते. अयनांत सहा मुहूर्त [वृद्धि होते ] ॥७॥ एक प्रस्थ वृद्धि ह्मणजे नाडिका. याविषयी पुढे श्लोक १७ वा पहा. सहा मुहूर्त दिनमानवृद्धि कोठे होते याविषयी विवेचन शेवटीं केलें आहे. द्विगुणं सप्तमं चाहुरयनाद्य त्रयोदश ।। चतुर्थ दशमं चैव द्विर्युग्माय बहुलेप्यतो ॥ ८ ॥ यजुःपाठ-प्रथमं सतमं चाहरयनाद्यं त्रयोदशं ॥ - अर्थास यजुःपाठच अवश्य आहे. अर्थ-प्रतिपदा, सप्तमी, त्रयोदशी, चतुर्थी, दशमी [ ह्या तिथि ] दोनदां अयनादि [ होत. त्या अनुक्रमें ] दोन दोन [ अयनांच्या ] आदि [ हौत.] कृष्णपक्षांतही [अयन होतें. ] ॥ ८ ॥ शुक्लपक्षांतील प्रतिपदा, सप्तमी, त्रयोदशी आणि कृष्णपक्षांतील चतुर्थी आणि दशमी, तसेंच पुनः शुक्लपक्षांतील प्रतिपदा, सप्तमी, त्रयोदशी आणि कृष्णपक्षांतील चतुर्थी आणि दशमी मिळून दहा तिथि ह्या पांच संवत्सरांत होणाऱ्या सूर्याच्या दहा अयनांच्या अनुक्रमें आदितिथि होत. अयनें माघ आणि आवम ह्यांत होतात असें वर सांगितले आहे. तेव्हां अर्थातच ह्या दहा तिथींतील एक माघांतील व दुसरी श्रावणांतील याप्रमाणे अनुक्रमें आहेत. या श्लोकाचा अर्थ याप्रमाणेच आहे असें *वेदांगज्योति तिील एकंदर पद्धतीवरून दिसून येते. पुढील श्लोकावर दिलेल्या गर्गवचनांवरूनच अर्थ दिसतो. या श्लोकांत "प्रथम, सप्तमं " असे नपुंसकलिंगी प्रयोरात आणि तिथि शब्द तर स्त्रीलिंगी व क्वचित् पुल्लिंगी आढळतो. नपुंसकलिंग, ली आढळत नाही. ही अडचण आहे. “प्रथम" इत्यादि शब्द नपुंसकलिंगी त णन "दिन" या शब्दाची विशेषणे केली, आणि महिन्यांतील अमुक मावदिवशीं अयन होते असें यांत सांगितले आहे असें घेऊ लागले, तर ते एक पटतीशी जळत नाही. यामुळे त्या तिथीच मानाव्या लागतात. वसस्त्वष्टाभगोजश्च मित्रः सर्वाधिनौ जलं ॥ धाता कशायना द्यावार्धपंच नमस्वतः ॥९॥ यजुःपाठ* ' बेदांगज्योतिष ' असें जेथे मोघम झटले आहे तेथे ऋग्यजुर्वेदांगज्यं तिष समजावें.