पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुक्री. अयं वेनश्चोदयत्पृश्निगर्भा ज्योतिर्जरायू रजसोविमाने क. सं.१०. १२३. " हा वेन उगवला आहे..." हे सूत्र वेनदेवतात्मक आहे. यांतील वर्णनावरून हे सूक्त कोणत्या तरी मोठ्या खस्थ ज्योतीस ह्मणजे तारेस किंवा ग्रहास अनुलक्षून आहे असे सहज मनांत येते. आणि तें शुक्रास अनुलक्षून आहे असे वेदांतील इतर स्थलींच्या वर्णनावरून दिसते. यज्ञामध्ये सोमरस ठेवण्याकरितां पात्रे असतात त्यांस 'ग्रह ' ह्मणतात. सोमाचे ग्रहण करितात ह्मणून त्यांस ग्रह ह्मणतात. यज्ञ चालला असतां प्रथम ग्रहांत सोम काढून ठेवतात आणि मग त्याच्या आहुति देतात. त्या आहुतींसही ग्रह ह्मणतात असे दिसते. अग्निष्टोम यज्ञामध्ये शुक्र आणि मंथी या नांवांचे दोन ग्रह असतात. त्यांसंबंधे शतपथब्राह्मणांत असें आलें आहे. चक्षुषी हवा अस्य शुक्रामंथिनौ । तद्वा एष एव शुन्रो य एष तपति तद्यदेष एतत्तपात तेनैष शुक्रअंद्रमा एव मंथी ॥ २॥...इमाम हैके शुक्रास्य पुरोरुचं कुर्वति । अयं वेनवोदयत्याश्निगर्भा ज्योतिर्जरायू रजसो विमान इति तदेतस्य रूपं कर्मो य एष तपतीति यदाह ज्योतिर्जरायुरिति॥८॥ शत. बा.४. २.१. “याचे शुक्र आणि मंथी हे चक्षु. जो हा प्रकाशतो तोच हा शुक्र. हा प्रकाशतो म्हणून हा शुक्र. चंद्रमाच मंथी. 'अयं वेनश्चोदयत् ' हीच ऋचा कोणी शुक्राची पुरोरुच् करितात. 'ज्योतिर्जरायुः' असे म्हटले आहे. 'य एषतपति.' असे याचें रूप करितों ( वर्णितों). यावरून वेन आणि शुक्र एकच असें सिद्ध होते. यांत चंद्रास मंथिन मटले आहे; परंतु मंथिन् ह्या शब्दाने 'शनि' घेण्याचाही संप्रदाय आहे. शुक्राला ल्याटिन भाषेत Venus (वीनस् ) असें एक नांव आहे. शुक्र याचें ग्रीक रूप Kupros होतें. ग्रीक लोक शुक्र देवता स्त्रीलिंगी मानीत म्हणून Kupris असें रूप झाले. त्याचे ल्याटिन रूप Cypris असें आहे. आणि Venus व Kupris अथवा Cypris हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. आणि त्यांचें “वेनः" आणि 'शुक्रः' यांशी सादृश्य* आहे. यावरून ग्रीक इत्यादि युरोपीय आर्य आणि भार• तीय आर्य प्राचीनकालीं एकत्र होते, तेव्हांच त्यांस शुक्र हा ग्रह आहे असें ज्ञान झाले होते असे दिसते. वस्व्यसि रुद्रास्यदितिरस्यादित्यासि शुक्रासि चंद्रासि बृहस्पतिस्त्वा मुम्ने रण्वत तै.सं.१.२.५. [हे सोमक्रयणि ] तूं वस्वी (वस्वादिदेवरूप ) आहेस, रुद्रा आहेस, अदिति आहेस, आदित्या आहेस; शुका आहेस, चंद्रा आहेस; बृहस्पति तुला [ ह्या ] सुखप्रदेशी रमवो. जी देऊन सोम विकत घ्यावयाचा त्या गाईस उद्देशून हे बोलणे आहे. आदित्यसंबंधी ती आदित्या, हे गाईचे विशेषण म्हणून स्त्रीलिंगी झाले आहे. तशीच शुका आणि चंद्रा ही रूपे आहेत. यांतही शुक्राहें शुक्रग्रहास अनुलक्षून दिसते. उत्पाताः पार्थिवांतरिक्षाछं नो दिविचरा ग्रहाः ॥७॥ शं नो भूमिपमाना शमुल्कानिहतं च यत् ॥८॥ नक्षत्रमुल्काभिहतं शमस्तु ॥ ९॥ शं नो ग्रहाश्चांद्रमसाः शमादित्याश्च राहणा ॥ शं नो मृत्युधूमकेतः शं रुद्रास्तिग्मतेजसः ॥ १० ॥ अथ. सं.१९.६. * हे सादृश्य रा०रा० बाळ गंगाधर टिळक यांणी सुचविलें.