पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४९) पूर्वाह्नो वै देवानां मध्यंदिनो मनुष्याणामपराह्नः पितृणां ॥ शत. बा. २.४.२. ८. पंचधा विभागांपैकी तिहींची नांवे पुढील ऋचेत आहेत. पांच उतायातं संगवे प्रातरन्हो मध्यदिन उदिता सूर्यस्य ।। दिवाननमवसा शंतमेन नेदानीं पीतिरश्विना ततान ।। क्र.सं. ५.७६. ३. यांत प्रातः, संगव, मध्यान्ह हे तीन विभाग स्वसंज्ञांनी सांगितले आहेत. त्यांवरून पांचांचे अनुमान होतें. देवस्य सवितः प्रातः प्रसवः प्राणः ॥ वरुणस्य सायमासवोपानः ।। यत्प्रतीचीनं प्रातस्तनात् । प्राचीन संगवात् ॥ ततो देवा अग्निष्टोमं निरमिमत ॥ तत्तदानवीर्य निर्मार्गः॥ मित्रस्य संगवः। तत्पुण्यं तेजस्व्यहः ॥ तस्मातहि पशवः समायति॥ यत्पतीचीनर संगवात् ॥ प्राचीनं मध्यंदिनात् ॥ ततो देवा उक्थ्यं निरमिमत ॥ तत् ०।। बृहस्पतेमध्यदिनः ।। तत्पु० ॥ तस्मातर्हि तेक्षिणष्ठं तपति ॥ यत्प्रतीचीनं मध्यंदिनात् ॥ प्राचीनमपराह्नात् ॥ ततो देवाः षोडशिनं निरमिमत ॥ तत्तदा० ।। भगस्यापराह्नः । तत्पु०॥ तस्मादपराह्ने कुमार्यो भगमिच्छमानाश्चरंति ॥ यत्पतीचीनमपराह्नात् ॥ प्राचीन सायात् ॥ ततो देवा अतिरात्रं निरमिमत ॥ तत्तदा० ॥ वरुणस्य सायं ॥ तत्पु०॥ तस्मात्तर्हि नानृतं वदेत् ॥ तै. बा. १. ५. ३. यांत प्रातः, संगव, मध्यान्ह, अपराह्न आणि सायं हे पांच विभाग आहेत. आदित्यस्त्वेव सर्व ऋतवः। यदैवोदेत्यथ वसंतो यदा संगवोथ ग्रीष्मो यदा मध्यदिनोथ वर्षा यदापराह्नोथ शरद्यदैवास्तमेत्यथ हेमंतः॥ शत. बा.२.२. ३. ९.तस्मा उद्यन्त्सूर्यो हिंकृणोति संगवः प्रस्तौति मध्यंदिन उगायत्यपराह्नः प्रतिहरत्यस्तं यनिधनं । अथ. सं. ९.६.४६. यांत संगव, मध्यंदिन, अपराह्न हे विभाग दिसत नाहीत; दिवसाच्या चार विभागांचे (प्रहरांचे) संधि दिसतात. कालमाधव ग्रंथांत दिवसाच्या पंचधा विभागाचा विचार करितांना तैत्तिरीय बाह्मणांतला वर दिलेला अनुवाक देऊन त्यावर माधव ह्मणतो, की प्रातरादि पांच विभागांच्या चार संधींच्या ठायीं अग्निष्टोम, उक्थ्य, षोडशि, अतिरात्र या चार सोमसंस्थांच्या निर्मितीविषयी त्यांत सांगितले आहे. व एकंदर विभागांविषयीं तो ह्मणतो की पंचधाविभाग बहुत श्रुतिस्मृतींत दृष्टीस पडतो. आश्वलायनसूत्रांत “प्रदोपांतो होमकालः संगवांतः प्रातः” असें आहे (ौतसूत्र ३.१२) यावरून "संगव" हा संधि नव्हे, एक विभागच होय. दिवसाचे मुहूर्तसंज्ञक १५ विभाग आणि तसेच रात्रीचे १५ विभाग तैत्तिरीयपंधरा मुहूर्त. ब्राह्मणांत सांगितले आहेत:अथ यदाह ॥ चित्रः केतुर्दाता प्रदाता सविता प्रसविताभिशास्तानमंतेति ।। . एष एव तत् ॥ एषह्ये व तेन्हो मुहूर्ताः॥ एष रात्रेः॥ तै. बा. ३.१०. ९.. वरील वाक्यांत सांगितलेले अनुवाक त्याच ब्राह्मणांत पूर्वी एकाच अनुवाकांत आले आहेत ते असे: