पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४७) वारांची सात नांवें वेदांत कोठे नाहीत. सात वारांची सामान्य संज्ञा जी वार वार. तो शब्द संहितेंत दोनदा आला आहे. आदित्पत्नस्य रेतसो ज्योतिष्पश्यति वासरं ।। परो यदिध्यते दिवा ॥ क्र. सं. ८.६.३०. "युलोकावर जेव्हां हा इंद्र सूर्यरूपाने प्रकाशतो तेव्हां चिरंतन उदकवान् अशा ह्या मूर्यरूपी इंद्राचें तेज सर्व दिवसभर पाहतात." सायणाचार्यांनी वासर शब्दाचा याप्रमाणे दिवस असा अर्थ करून शिवाय तें "ज्योतिः" याचे विशेषण करून त्या वेळी त्याचे "निवासकं " "निवासस्य हेतुभूतं" असे दोन अर्थ केले आहेत. पुढील ऋचेत सूर्य दिवस वाढवितो ही म्हणजे दिनमान कमजास्त होण्याची दिनमान कल्पना आली आहे. सोमराजन् प्रण आयूंषि तारीरहानीव सूर्यो वासराणि ।। क्र.सं. ८.४८.७. "हे सोमराजन्, वासर (जगद्दासक) असे दिवस सूर्य जसा वाढवितो तशी आमची आयुष्ये तूं वाढीव." यांत वासर शब्द आहे, परंतु तो दिवस या अर्थी नाहीं. विषुव दिवसाविषयीं वेदांत पुष्कळ निर्देश आहे. संवत्सरसत्राविषयों तैत्तिरीय विषुव. संहितेतील एक अनुवाक वर दिला आहे (पृ. ३८) त्यांत विषुवाविषयी आलेच आहे. विषुवाविषयीं दुसरेही निर्देश येथे देतो. संवत्सरारंभाच्या विचारांतही त्यांचा उपयोग पडेल. पुढील चमत्कारिक वर्णन पहा. एकविंशमेतदहरुपयंति विषुवंतं मध्ये संवत्सरस्यैतेन वै देवा एकविंशेनादित्यं स्वर्गीय लोकायोदयछंत्स एष इत एकविंशस्तस्य दशावस्तादहानि दिवाकीर्त्यस्य भवंति दश परस्तान्मध्य एष एकविंश उभयतो विराजि प्रतिष्ठितस्तस्मादेषोंतरेमां लोकान्यन न व्यथते तस्य वै देवा आदित्यस्य स्वर्गाल्लोकादवपातादबिभयुस्तं त्रिभिः स्वर्गलोकैरव स्तात्प्रत्युत्त नवन् स्तोमा वै त्रयः स्वर्गा लोकास्तस्य पराचोतिपातादविभयुस्तं त्रिभिः स्वगैलोकैः परस्तात्प्रत्यस्तभ्नवंस्तोमा वै त्रयः स्वर्गा लोकास्तत्र योऽवस्तात्सप्तदशा भवंति त्रयः परस्तान्मध्य एष एकविंशः ऐ. बा. १८. १८. अर्थ-संवत्सराच्या मध्यभागी विषुव दिवशी एकविंशाह करितात. ह्या एकविंशाने देवांनी आदित्याला स्वर्गास चढविलें. तो हा एकविंश. त्या दिवाकर्त्यांच्या पूर्वी दहा दिवस असतात, दहा दिवस पाठीमागून असतात. मध्ये हा एकविंश. याप्रमाणे दोहोंकडून दहादहांच्यामध्ये असल्यामुळे हा [ एकविंश ह्मणजे आदित्य । या लोकांत चालतांना व्यथा पावत नाहीं. तो आदित्य स्वर्गाहून खाली पडेल का णून देव भ्याले. [ त्यांनी ] त्याला अलीकडे तीन स्वर्गलोकांचा आधार देऊन सांवरून धरिलें. [ विषुव दिवसाच्या पूर्वी तीन स्वरसाम दिवस असतात त्या दिवशी जे म्हणतात ते तीन ] स्तोम हेच तीन स्वर्गलोक. तो [ सूर्य ] त्यांच्या पलीकडे पडेल म्हणून ते [ देव ] भ्याले. त्यांनी तीन स्वर्गलोक त्याच्या पलीकडे ठेवन याला तोलून धरिलें. [ विषुवानंतर तीन दिवशींचे तीन] स्तोम हेच तीन स्वर्गमा अलीकडे सतरा असतात, पलीकडे तीन, मध्ये हा एकविंश (एकविसावा ) तैत्तिरीय ब्राम्हणांतही एके ठिकाणी बहुतेक अंशी यासारखेंच वर्णन आलेले