पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ही काही गोष्टी आहेत ह्मणून तो सर्वच येथे देतो. गवामयन (संवत्सरसत्र) याची दीक्षा कधी घ्यावी हा विचार यांत आहे. संवत्सराय दीक्षिष्यमाणा एकाष्टकायां दीक्षेरनेषा वै संवत्सरस्य पत्नी यदेकाष्टकैतस्यां वा एष एता रात्रि वसति साक्षादेव संवत्सरमारभ्य दीक्षत आतं वा एते संवत्सरस्याभिदीक्षते य एकाटकायां दीक्षतेऽतनामानावृतू भवतो व्यस्तं वा एते संवत्सरस्याभिदीक्षते य एकाष्टकायां दीक्षतेऽतमानावृतू भवतः फल्गुनीपूर्णमास दीक्षरन्मुखं वा एतत् ॥ २॥ संवत्सरस्य यत्फल्गुनीपूर्णमासो मुखत एव संवत्सरमारभ्य दाक्षते तस्यकैव निर्या यत्सांमध्ये विषूवात्संपद्यते चित्रापूर्णमासे दीक्षेरन्मुखं वा एतत्संवत्सरस्य यचित्रापूर्णमासो मुखत एव संवत्सरमारभ्य दीक्षते तस्य न काचन निर्या भवति चतुरहे पुरस्तात् पौर्णमास्यै दीक्षेरन् तेषामेकाष्टकायां क्रायः संपद्यते तेनैकाष्टकां न छंबद कुर्वति तेषां ।। २ ॥ पूर्वपक्षे सुत्या संपद्यते पूर्वपक्षं मासा अभिसंपद्यते ते पूर्वपक्षे रत्तिष्ठति तानुत्तिष्ठत ओषधयो वनस्पतयोनत्तिष्ठति तान् कल्याणी कीतिरनूत्तिष्ठत्यरात्सुरिमे यजमाना इति तदन सर्वे राध्रुवंति ॥ तै. सं. ७. ४. ८. अर्थ-संवत्सर [ सत्रा] करितां दीक्षा घेणारांनी एकाष्टकेच्या ठायीं (त्या दिवशी) दीक्षा घ्यावी. एकाष्टका ही संवत्सराची पत्नी. तो त्या रात्रीं तिच्याजवळ वास करितो. [ ह्मणून एकाष्टकेच्या दिवशी दीक्षा घेतात ते] साक्षात् संवत्सराच्या आरंभींच दीक्षित होतात. जे एकाष्टकेस दीक्षा घेतात ते संवत्सराच्या पीडेप्रत दीक्षित होतात. (त्यांचे) शेवटच्या नांवांचे दोन ऋतु होतात. जे एकाष्टकेस दीक्षा घेतात ते संवत्सराच्या व्यस्तापत दीक्षित होतात (त्यांचा संवत्सर व्यस्त होतो). [त्यांचे] दोन ऋतु शेवटल्या नांवांचे होतात. फल्गुनीपूर्णमासी दीक्षा घ्यावी. फल्गुनीपूर्णमास हे संवत्सराचे मुख. [ ह्मणून या दिवशी दीक्षित होतात ते] मुखापासूनच संवत्सरास आरंभ करून दीक्षित होतात. [ परंतु ] त्यास एकच निर्या ( दोष ) आहे, की सांमध्याच्या ठायीं विषुवान् येतो. [ह्मणून ] चित्रापूर्णमासी दीक्षा घ्यावी. चित्रापूर्णमास हे संवत्सराचे मुख होय. [ ह्मणून या दिवशी यज्ञास आरंभ करितात ते ] मुखापासूनच संवत्सरास आरंभ करून दीक्षित होतात. यांत कोणताच दोष नाही. पूर्णिमेच्या पूर्वी चवथे दिवशी दीक्षा घ्यावी. त्यांचा एकाष्टकेस [सोमाचा ] क्रय साधतो. त्या योगानें [ते ] एकाष्टकेस निष्फल करीत नाहीत. त्यांची पूर्वपक्षांत सुत्या साधते. पूर्वपक्षांत मास साधतात. ते पूर्वपक्षांत उठतात. ते उठतात त्यांच्यामागून ओषधि आणि वनस्पति उठतात. हे यजमान ( यज्ञ करणारे ) समृद्ध झाले, अशी त्यांची कल्याणदायक कीर्ति होते. त्यांप्रमाणे सर्व समृद्ध होतात. सामवेदाच्या तांड्य ब्राह्मणांत (५. ९) हा अनुवाक आला आहे त्यांत कांहीं शब्द आणि एक दोन वाक्ये मात्र निराळी आहेत.* यांत फल्गुनीपूर्णमास आणि चित्रापूर्णमास हे शब्द आहेत. त्यांचा अर्थ फल्गुनीयुक्त आणि चित्रायुक्त पूर्णिमा इतकाच आहे. फाल्गुन, चैत्र असे शब्द यांत नाहीत, इतकेच नाही तर फाल्गुनी, चैत्री ह्या संज्ञाही नाहीत, हे लक्ष्यांत ठोविले पाहिजे. न पूर्वयोःफल्गुन्योरमिमादधीत ॥ एषा वैजघन्या रात्रिः संवत्सरस्य ।। यत् पूर्वेफल्गुनी ॥ पृष्टित एव

  • तांड्य ब्राह्मणांत 'अपोनभिनंदंतोभ्यवयंति' (यज्ञकर्ते अवभृथस्नानास जातात तेव्हां उदकाचें अभिनंदन करीत नाहीत, असा एकाष्टकेचा आणखी एक दोष सांगितला आहे. आणि 'सांमध्य' यानहल.त्यांत 'समय' सन्द आहे. त्याचा अर्थ मेघयक्त दिवशी' असा सायणाने केला आहे.