पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चा येतो. ब्रह्मसिद्धांताप्रमाणे धनुराशीचा येतो. एकंदरीत इतकेंच सांगावयाचें की ब्रह्मसिद्धांताप्रमाणे ही स्थिति उत्कृष्ट मिळते. आणि तिजविषयी अनेक गोष्टी विचारांत घेऊनही काही संशय राहत नाही. यावरून शके ८१९ मध्ये ब्रह्मसिद्धांत निजरूपाने प्रचारांत होता असें निःसंशय सिद्ध होते. हे पुराण अकालवर्षनामक राष्ट्रकूटवंशीय राजा दक्षिणेत राज्य करीत असतां त्याच्या कारकीर्दीत दक्षिणेतच रचिलेले आहे. यावरून शके ८१९ मध्ये दक्षिणेत ब्रह्मसिद्धांत निजरूपाने चालत होता. मागाहून त्यास बीजसंस्कार कल्पिला. तो त्यानंतर कोणी कल्पिला असावा. वरुणाची ब्रह्मसिद्धांतावरील टीका शके ९६२ च्या सुमाराची आहे. तीत बीजा विषयी काही उल्लेख नाही. राजमृगांककरणग्रंथ शके ९६४ बीज. मध्ये झाला, त्यांत तो संस्कार आहे. त्याच वेळी तो कल्पिला असे मला वाटते. त्या संस्कारांत सूर्यासही बीजसंस्कार आहे. यामुळे ब्रह्मसिद्धांताचें मूळचें वर्ष ३६५।१५।३०।२२।३० होतें तें संस्काराने सुमारे ३६५।१५।३१।१७ इतकें झाले आहे. ह्मणजे प्रथमार्यसिद्धांतवर्षाहून सुमारे २ विपळे जास्त झाले. यापुढील ब्रह्मपक्षाचे जे ग्रंथ आढळतात ते बीजसंस्कृतब्रह्मसिद्धांततुल्यच आहेत. अशा करणग्रंथांत पहिला शके ९६४ मधील राजमृगांक होय. दुसरा शके ९८० या वर्षीचा करणकमलमार्तड हा होय. यानंतरचा भास्कराचार्याचा शके ११०५ मधील करणकुतूहल हा आहे. महादेवीसारणी या नांवाचा शके १२३८ मधील ग्रहसाधनाचा ग्रंथ, दिनकर नामक ज्योतिष्याचे खेटकसिद्धि आणि चंद्रार्की हे शके १५०० या वर्षीचे दोन ग्रंथ, हेही बीजसंस्कृतब्रह्मसिद्धांततुल्य आहेत. यांतील करणकुतूहल तर अद्यापिही कोठे कोठे प्रचारांत आहे. ग्रहलाघवकर्त्याने कांहीं ग्रह ब्रह्मपक्षाचे ह्मणून घेतले आहेत, ते करणकुतूहल ग्रंथांतले आहेत. ब्रह्मसिद्धांत निजरूपाने फार तर शके १००० पर्यंत प्रचारांत असेल. भास्कराचार्यानंतर तो नित्य प्रचारांतून गेला असावा. इतकेंच नाही, तर ब्रह्मसिद्धांताचे सर्व काम भास्कराचार्यकत सिद्धांतशिरोमणीने उत्कृष्ट होऊ लागल्यामुळे ब्रह्मसिद्धांत पुस्तकही लोपत चालले असावे असे दिसते. भास्कराचार्यानंतरच्या ग्रंथांत ब्रह्मसिद्धांतांतले उतारे क्वचितच दृष्टीस पडतात. सांधत महाराष्ट्रांत ब्रह्मसिद्धांत पुस्तक बहुधा फारसें आढळत नाही. इतर प्रांतांतही हीच अवस्था असावी. एकंदरीत पाहतां ज्योतिःशास्त्र ज्या रूपाने आपल्या देशांत आढळतें त्याच्या ज्योतिःशास्त्रस्थिति पद्धतीच्या बहुतेक अंगांची स्थापना ब्रह्मगुप्ताच्या वेळी पूर्णपणे झाली असें ह्मणण्यास हरकत नाही. वेधानें ग्रहस्थितीमध्ये फेरफार व्हावयाचा तो मागाहून वेळोवेळी झाला. परंतु पद्धतीमध्ये नवीन शोध किंवा सुधारणा अयनगतीवांचून दुसरी मागाहून विशेष झाली नाहीं असें झणण्यास हरकत नाही. ग्रहभगण, मंदोचें, पात यांसंबंधे ब्रह्मगुप्त हा स्वतंत्र शोधक होता हे पूर्वी सांगितलेच आहे. ग्रहस्पष्टीकरणसंबंधे उपकरणेही त्याची स्वतंत्र दिसतात. विपश्वाधिकारांतही याचे पूर्वग्रंथकारांपेक्षा जास्त कौ

  • मूळ श्लोक सदई पुस्तकांत बराच अशुद्ध आहे. तो आणि मी शुद्ध केलेला श्लोक व त्याविष. यीं स्पष्टीकरण मो० भांडारकरांचा पुस्तकसंग्रहाचा स. १८८३1८४ चा रिपोर्ट पृ. १२९।३० यांत पहा.