पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१५) याने कालावर भिस्त न ठेवितां आपली कति आपणच सोडून दिली हे त्यास काचत् लांछनच होय. परंतु अशा महान् विद्वानाच्या उत्तम कृतीने विद्वानांचा पताप होणार नाही असे कसे होईल? त्याच्याचसारखा महान् ज्योतिषी जो भास्कराचार्य याने तर त्याचाच आगम स्वीकारला आहे. भास्कराचार्याच्या पूर्वीचेही दान करणग्रंथ ब्रह्मसिद्धांतानुयायी आढळतात. या सर्वांत ब्रह्मसिद्धांतावरून येणाऱ्या ग्रहांस एक बीजसंस्कार मात्र कल्पिला आहे. शके ९६४ मध्ये झालेल्या राजमृगांककरणांत हा संस्कार प्रथम आढळतो. परंतु त्यापूर्वी या बीजसंस्कारावांचून केवळ निजरूपानें ब्रह्मसिद्धांत प्रचारांत होता याचे एक उदाहरण मला आढळले आहे. निजरूप. सन १८८३८४ च्या पुणे कालेजसंग्रहांत गुणभद्रत उत्तरपुराण ह्मणून एक जैनग्रंथ सांपडला आहे (नं. २८९). त्यांत त्याचा रचनाकाल असा सांगितला आहे: शकनृपकालाभ्यंतरविंशत्यधिकाष्टशत ८२० मिताब्दान्ते ॥ मंगलमहार्थकारिणि पिंगलनामनि समस्तजनसुखदे ।। ३५ ॥ श्रीपंचम्यां बुधायुजि दिवसवरे मंत्रिवारे सुधांशौ । पूर्वायां सिंहलग्ने धनुषि धरणिजे वृश्चिकाऊ, तुलागो । सूर्ये शक्रे कुलीरे गविच सुरगरौ या श्लोकांवरून त्या वेळची ग्रहस्थिति अशी होती:सूर्य-कुलीर (कर्क ) राशीस गुरु-गवि (वृषभी) चंद्र-पूर्वा [ भाद्रपदा ] मध्ये शुक्र-कुलीर (कर्क) राशीस मंगळ-धनुराशीचा शनि ( आर्कि)-वृश्चिक राशसि बुध-आनिक्षत्रीं राहु (अगु)- तुला राशीस शके ८१९ गत या वर्षी पिंगल संवत्सर येतो. ८१९ गत झणजे ८२० वर्तमान. यांत गणितास ८१९ घ्यावे की ८२० ही प्रथम शंका येते. तसेंच श्लोकांत मासपक्ष नाहीं, तिथि मात्र आहे. वार मंत्रिवार आहे. तो बहुधा गुरुवार किंवा कदाचित् शुक्रवारही असेल असें मनांत येते. परंतु श्लोकांत सर्व ग्रहांची स्थिति आहे यामुळे ती सर्व स्थिति मिळेल तो दिवस खरा हे उत्कृष्ट साधन आहे. शके ८१९ आणि ८२० या दोन वर्षांतील अनेक दिवसांचे गणित करून पाहतां शके ८१९ (गत) अमान्त आषाढ कृष्ण ५ गुरुवार ता. २३ जून सन ८९७ या दिवशी सूर्योदयापासून सुमारे २४ घटींपर्यंत अशी स्थिति होती. श्लोकांत सिंहलग्न आहे तें सूर्योदयापासून सुमारे ४ पासून ९ घटींपर्यंत होते. दोन वर्षांत या दिवसावांचून दुसऱ्या कोणत्याही दिवशी ही स्थिति संभवतच नाही. यांत चंद्राची स्थिति आहे ती एक दिवसही पुढे किंवा मागे घेऊन जमत नाही. हे एथे सांगण्याचे कारण इतकेंच की, यांतील ग्रहस्थिति ब्रह्मसिद्धांताप्रमाणे ब्रह्मगुप्ताने दिलेलें वर्षमान घेऊन मात्र जमते. इतर कोणत्याही सिद्धांताप्रमाणे जमत नाही. सूर्यसिद्धांताप्रमाणे आषाढ रु. ५ गुरुवारी सूर्य मिथुनराशीचा येतो. शुक्रवारी सूर्योदयानंतर सुमारे ५ घटिकांनी कर्कराशीचा होतो. दुसऱ्या कोणत्याच सिद्धांतानें गुरुवारी कर्फीचा येत नाही. त्या शकांत ब्रह्मसिद्धांताची कोणतीही संक्रांति सांप्रतच्या सूर्यसिद्धांताच्या संक्रांतीपेक्षा ६१ घटी ३१ प. पूर्वी होते. तसेंच मंगळही सांप्रतच्या सूर्यसिद्धांताप्रमाणे गुरुवारी मकरराशी