पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१९) दोन्ही सूर्यसिद्धांत यांतील मानांनी कलियुगारंभी सर्व मध्यमग्रह एकत्र येतात परंतु या ब्रह्मसिद्धांतानें तसे येत नाहीत. सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांत कल्पारंभानंतर काही वर्षे सृष्टयुत्पत्तीकडे गेली असे मानले आहे तसेंही यांत नाही. यांत कल्पारंभ तोच ग्रहचारारंभ आहे. वरील मानांसंबंधे प्रथम विचार करण्यासारखी गोष्ट ही की यांतील वर्षांचें मान वमा ३६५।१५।३०।२२।३० हे पंचसिद्धांतिकोक्त पुलिश आणि रोमक यांखेरीज भारतवर्षीय कोणत्याही सिद्धांतापेक्षा कमी आहे. पंचसिद्धांतिकोक्त पुलिश आणि रोमक हे ब्रह्मगुप्ताच्या वेळी प्रचारांत नव्हते हे प्राचीन आणि वर्तमान सिद्धांतपंचकांच्या विवेचनांत स्पष्ट झालेच आहे. प्रथमायसि. द्धांत आणि मूलसूर्यसिद्धांत हे त्याच्या वेळी चालत होते. त्यांतील मूलसूर्यसिद्धांतापेक्षा ब्रह्मसिद्धांताचें वर्ष ६७१ विपळें कमी आणि प्रथमार्यसिद्धांतापक्षां ५२३ विपळे कमी आहे. हे अंतर थोडे दिसते.परंतु यामुळे ब्रह्मसिद्धांताची मेषसंक्रांत शके५४० मध्य प्रथमार्यसिद्धांताच्या मेषसंक्रमणापूर्वी ५४ घ. १४१ पळे आणि मूलमूर्यसिद्धांताच्या पूर्वी ५४ घ. ४३३ पळे झाली. असे होण्याचे कारण काय ? याचे कारण मला एकच दिसते. आणि ते हे की, ज्या दिवशी दिनरात्रिमान सारखे होते त्या विषुवदिवशी ह्मणजे ज्या दिवशी क्षितिजाच्या बरोबर पूर्वबिंदूंत सूर्य उगवतो त्या दिवशी त्यानें मेषसंक्रमण मानले. असें मेषसंक्रमण ह्मटले ह्मणजे ते सायनरवीचे होय. ब्रह्मगुप्तानें प्रत्यक्ष वेध ज्या काली घेतले असतील त्या कालच्या सुमारास सायनस्पष्टरवीचे मेपसंक्रमण ज्या वेळी होते त्याच वेळेच्या समारास ब्रह्मसिद्धांताचे होते. शके ५०९ मध्ये ब्रह्मसिद्धांताप्रमाणे स्पष्ट मेषसंक्रमण चैत्र शु०३ भौमवार ता. १८ मार्च सन ५८७ या दिवशी उज्जयिनी मध्यममूर्योदयापासून ५६ घ. ४० पळे या वेळी येतें. आणि त्या वर्षी सायनस्पष्टरवीचें मेषसंक्रमण (रवि 100 ) त्याच दिवशी त्याच वेळी येतं. ब्रह्मगुप्ताचें जन्म शके ५२० मध्ये झाले. त्याने वेध घेण्यास आरंभ शके ५४० च्या सुमारे केला असेल. म्हणून शके ५४० चे गणित करून पाहता त्या वर्षी ब्रह्मसिद्धांताप्रमाणे स्पष्टमेषसंक्रमण चैत्र कृ. १ शनिवार घ. ५७ प. २२ या वेळी येते. आणि त्या वेळी सायनस्पष्टरवि० रा. अं. ३० कला येतो. म्हणजे ब्रमसिद्धांताच्या मेषसंक्रमणापूर्वी सुमारे ३० घटिका सायनमेषसंक्रमण झाले. परंतु मेपसंक्रमणकाली ३० घटिकांत सूर्याची क्रांति सुमारे १२ कला मात्र वाढते, यामुळे श. ५४० मध्ये ब्रह्मसिद्धांतमेषसंक्रमणकालीं सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेस १२ कला मात्र असला पाहिजे. आणि त्या दिवशी सूर्योदयींच ब्रह्मसिद्धांताचें मेषसंक्रमण झाले असते तर त्या वेळी पूर्वबिंदूच्या उत्तरेस १२कला सूर्यमध्यबिंदु दिसला असता. परंतु सूर्योदयींच मेषसंक्रमण नेहमी होतें असें नाही.ही गोष्ट, दिक्साधन करण्यामध्ये कांहीं कलांची चुकी होण्याचा संभव, आणि वेधाची साधनें स्थूल, इतक्या गोष्टी मनांत आणिल्या असतां, यांचा ज्याला अनुभव आहे त्याच्या लक्ष्यांत सहज येईल की १२ कलांची चुकी होण्याचा संभव आहे. आणि यावरून मला निश्चयाने

  • सायनरवीचे गणित केरोपंती . सा.को. वरून केले आहे. ते पुस्तक फार सूक्ष्म नसल्यामले सदह गोष्ट कदाचित् एक वर्ष मांगे पुढे येईल. तसेच वरील गणितांत रवीस कालांतर संस्कार दिला नाही. तो त्या सुमारास समारे २ कला आहे. यामुळेही २२ वर्षांचा फेर पडेल.