पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१८) द्धांताशी सम्यि नाही. यावरून दोहोंचा काही संबंध नाही असे स्पष्ट दिसते, विष्णुधर्मोत्तर *पुराण म्हणून एक पुराण आहे. त्यांत एक ब्रह्मसिद्धांत आहे. भटोपलानें बृहत्संहितेत ब्रम्हगुप्तसिद्धांतांतल्या पुष्कळ आर्या घेतल्या आहेत. त्यांतील बहुतेक स्थली “ब्रह्मसिद्धांत " असेंच म्हटले आहे. कोठे “तथा च ब्रह्मगुप्तः" असे म्हटले आहे. शाकल्योक्त ब्रह्मसिद्धांत किंवा विष्णुधर्मोत्तरपुराणांतर्गत ब्रह्मसिद्धांत यांचा उल्लेख उत्पलानें कोठेच केला नाही. यावरून ते दोन सिद्धांत त्याच्या धेळी असल्यास फारसे प्रसिद्ध नव्हते, निदान उत्पलाचे मत तरी ब्रह्मसिद्धांत म्हणजे ब्रह्मगुप्ताचा असें होतें. ब्रह्मगुप्तानेही आपल्या सिद्धांतास सर्वत्र "ब्राह्मस्फुटसिद्धांत " किंवा "ब्रह्मसिद्धांत " म्हटले आहे. मीही सोईसाठी या लेखांत या सिद्धांतास यापुढे 'ब्रह्मसिद्धांत ' म्हटले आहे. भगणादि मान. ब्रह्मसिद्धांतांतील भगणादि मानें खाली दिली आहेत. कल्प ह्मणजे ४३२००००००० वर्षे इतक्या कालांत. सावनदिवसादि माने.- भोगभगण. मंदोच्चभगण. पातभगण शनि 0 नक्षत्र भ्रम १५८२२३६४५०००० रवि ४३२००००००० ४८० सावन दिवस १५७७९१६४५०००० चंद्र ५७७५३३००००० चंद्रोच्च ४८८१०५८५८ राहु २३२३१११६८ मंगळ २२९६८२८५२२ २९२ २६७ बुध १७९३६९९८९८४ ३३२ ५२१ ३६४२२६४५५ ८५५ शुक्र ७०२२३८९४९२ ६५३ १४६५६७२९८ ५८४ सौरमास ५१८४०००००० अधिमास १५९३३०००० चांद्रमास ५३४३३३०० तिथि १६०२९९९०००००० क्षयाह २५०८२५५०००० वर्षमान दि. घ. प. विपळे. प्रतिविपळे.. मा ३६५ १५३० २२ ३० यांतील सर्व माने कल्पांतील आहेत. ग्रहभगणांच्या सर्व संख्या कोणत्याही एका संख्येने विभाज्य नाहीत, यामुळे या ब्रह्मसिद्धांताप्रमाणे कल्पारंभावेरी मध्ये कोणत्याही वेळी सर्व मध्यमग्रह एका स्थली येत नाहीत. प्रथमासिद्धांत व * याची एक प्रत डे. का. संग्रहांत आहे. 0 0