पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०८) तल्या गति अशाच आहेत म्हटले तरी चालेल. कोणतेही उच्च किंवा पात याचा गति आमच्या ग्रंथांप्रमाणे एका वर्षांत विकलेच्या तिसऱ्या हिशाहून जास्त नाही. युरोपियन मानाने उच्चगति विकलेहून जास्त आहेत. आतां यासंबंधे आमच्या ग्रंथांस, कागदावरील अंक पाहून तोंडाने दोष देणे फार सोपे आहे. परंतु आकाशात एक विकला समजण्यास सांप्रतच्या मूक्ष्मयंत्रांनीही किती प्रयास पडतात हे ज्यास माहित आहे तो तसा दोष देणार नाही. कांहीं ग्रहनक्षत्रांच्या युति मी प्रत्यक्ष नुस्त्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत, त्यांवरून माझ्या अनुभवास असें आले आहे की, सूक्ष्म दुर्बिणीनं ज्या दोन ग्रहादिकांमध्ये सुमारे ५ कला (३०० विकला) किंवा याहूनहा कांहीं जास्त अंतर दिसते ते ग्रह नुस्त्या डोळ्यांनी एकमेकांस स्पर्श झालेले दिसतात. म्हणजे त्यांमध्ये अंतर मुळीच दिसत नाही. तेव्हां आमच्या ग्रंथांतील कोणत्याही मानांची युरोपियन मूक्ष्म मानांशी तुलना करितांना ही गोष्ट लक्ष्यांत ठेविली पाहिजे. आणि त्याप्रमाणे उच्चे आणि पात यांसंबंधे आमच्या ग्रंथांस दोष न देतां त्यांची तारीफच केली पाहिजे. उच्चे आणि पात यांची गति फार मूक्ष्म आहे इतकें आमच्या ग्रंथकारांच्या लक्ष्यांत आले होते, हा आपण त्यांचा गुण घेतला पाहिजे. त्यांच्या वेळचे उच्च आणि पात यांचे भोग त्यांच्या ग्रंथांवरून जे निघतात ते कितपत सूक्ष्म आहेत एवढे मात्र पाहिले पाहिजे. शके ४२१ मधील आमच्या ग्रंथांवरून येणारी उच्चपातस्थिति वर (पृ. २०५) दिली आहे. आणि तिची केरोपंती पुस्तकावरून येणाऱ्या स्थितीशी तुलना करून कमजास्त अंतर दिले आहे. त्यावरून आमच्या सिद्धांतांतील स्थिति बन्या स्थितीच्या पुष्कळ जवळ आहे असे दिसून येईल. केरोपंतीवरून आलेली स्थिति सायन आहे. तरी श. ४२१ मध्ये अयनांश सुमारे २० कला मात्र असल्यामुळे ती निरयन आहे असे समजून तुलना करण्यास हरकत नाही. सूर्याचें उच्च तर फारच थोडें चुकले आहे. शुक्राच्या उच्चामध्ये मात्र फार चुकी दिसते. तिचे कारण काय असेल ते असो. ती एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु बाकीची उच्चें पाहिली तर पहिल्या आर्यभटाच्यांत बधाचे उच्च २४ अंश कमी आहे, बाकीची १० अंशांच्या आंतच कमजास्त आहेत. सूर्यसिद्धांताची याहून शुद्ध आहेत. त्यांत बुधाचे १३ अंश कमी, आणि शनीचे ८ अंश कमी आहे. मंगळ व गुरु यांची तर फारच थोडी चुकलेली आहेत. ब्रह्मगुप्ताची ही सूर्यसिद्धांताइतकी किंवा त्याहून जास्त शुद्ध आहेत. पृ. २०६ यांतील कोष्टकांत टालमीच्या उच्चांची केरोपंतीशी तुलना केली आहे. टालमीची इतर माने सायन आहेत त्याप्रमाणे ही सायन असावी असें अनुमान होतेच. आणि त्याप्रमाणेच रवीच्या उच्चावरूनही तें स्पष्ट आहे. म्हणून त्यांची केरोपंतीवरून निघालेल्या सायनांशी तुलना करण्यास हरकत नाही. आणि ती तुलना पाहिली असतां सहज दिसते की त्याच्याही शुक्राच्या उच्चांत अतिशय चुकी असून शिवाय एकंदरीत त्याची उच्चे सूर्यसिद्धांत आणि ब्रह्मसिद्धांत यांहून जास्त चुकलीं आहेत. पात (पृ. २०५) पाहिले तर आर्यभटाचे सरासरीने ४ अंश चुकीचे आहेत. सूर्यसिद्धांताचे ४ अंश चुकीचे आणि ब्रह्मगुप्ताचे ७ अंश चुकीचे आहेत. आणि टालमीचे (पृ. २०६) तर ३० अंश चुकीचे आहेत. त्याचे शनि गुरुपात फारच चुकीचे आहेत. त्याचे रव्युच्च ६५ अंश ३० कला आहे. त्याच्या वेळी म्हणजे