पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०१) सिद्धांतांतील ग्रहांचे १० व्या कोष्टकांत दाखविलेलें (सूर्यसंबंधी तुलनेचे) अंतर बुधाचें मात्र बरेंच आहे. गुरूचे ५३ कला आहे आणि बाकीच्यांचे २२ कलांच्या आंतच आहे. एकंदरीत पाहतां सांप्रतच्या सूर्यसिद्धांताखेरीज बाकीच्यांचे ग्रह शके ४२१च्या सुमारास चांगले शुद्ध येत होते असें झणण्यास हरकत नाही. चंद्र तर सर्वांचा फारच सूक्ष्म साधला आहे. ब्रह्मगुप्ताखेरीज सर्वांचे चंद्रभगण सारखेच आहेत. परंतु वर्षमान निराळे असल्यामुळे वर दिलेल्यांत सांप्रतच्या सूर्यसिद्धांताचा चंद्र इतरांहून थोडा निराळा आला आहे. बुधास अंतर सर्वांचें बरेंच आहे. याचे कारण तो मूर्याच्या सन्निध नेहमी असणार, यामुळे त्याचे वेध घेण्याची संधि फार थोडी सांपडणार, हेच दिसते. युरोपियन ग्रंथांवरून आलेले मध्यम ग्रह आणि आमच्यांवरून आलेले मध्यम ग्रह यांच्या तुलनेवरून आमच्या ग्रंथांची शुद्धाशुद्धता ठरविणे ही रीति सर्वांशी आणि सर्वत्र निर्भय नाहीं हें बेंटलीच्या ग्रंथकालनिर्णयपद्धतीचे विवेचन वर (पृ. ७२ इत्या.) केले आहे त्यावरून दिसून येईल. परंतु आमचे ग्रंथ दृक्प्रत्ययास कितपत येत होते हे पाहण्यास याहून दुसरा चांगलासा मार्ग नाहीं झटले तरी चालेल, ह्मणून तोच एथे स्वीकारिला आहे. आमच्या निरनिराळ्या ग्रंथांतील भगणादि मानें पूर्वी काही दिली आहेत व कांही पुढे येतील. परंतु सांप्रतच्या युरोपियन मानांशी तुलना करता येण्याकरितां एका नाक्षत्र प्रदक्षिणेस (भगणास) लागणारे काल युरोपियन व आमचे असे पुढे पृ. २०३ यांत दिले आहेत. यांतील टालमीची मानें बर्जेसच्या सूर्यसिद्धांताच्या भाषांतरावरून घेतली आहते. सूर्यसिद्धांत आणि ब्रह्मगुप्तसिद्धांत (अथवा सिद्धांतशिरोमणि) यांची मानेंही त्यावरूनच घेतली आहेत. माझी गणित करण्याची रीति निराळी असल्यामुळे हीं माने काढण्याचे कधीं कारण पडलें नाहीं यामुळे ती तपासून पाहिली नाहीत. तथापि त्यांत बहुधा चूक नाही.* सांप्रतची युरोपियन मानें लुमिसच्या Practical Astronomy या पुस्तकावरून मी काढिली आहेत. सांप्रतची युरोपियन माने पाहिली असता दिसते की, आमच्या सूर्यसिद्धांताचें वर्ष सुमारे ८ प. ३४.५ विपळे जास्त आणि ब्रह्मसिद्धांताचे ७ पळे २५.६ विपळे जास्त आहे. चंद्राची गति फार असूनही तींत बहुधा चूक नाही ह्मटली तरी चालेल. राहुभगणास सुमारे ४ दिवसांचा आणि शनीच्यास ६ दिवसांचा फरक आहे. बाकीचे फरक १ दिवसाच्या आंत आहेत. दालमीनें दिनगति दिल्या आहेत त्यांवरून, त्याने मानलेली संपातगति (वर्षास ३६ विकला ) हिशेबांत घेऊन टालमीची मानें काढिलीं टालमी. आहेत असें प्रो. व्हिटने म्हणतो. त्यांचे आमच्या सिद्धांतांती ल मानांशी मुळीच साम्य नाही. यावरून टालमीच्या ग्रंथांतली ग्रहगतिस्थिति आमच्या सिद्धांतांत घेतलेली नाही असे सिद्ध होतें. * कदाचित असली तरी माझें या पुस्तकांतील कोणतेही गणित या मानांवरून केलेले नाही.