पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११) स्मृति, महाभारत इत्यादिक यांतला इतिहास आहे. वेदांगांत ज्योपाचे ग्रंथ आहेत; त्यांत केवळ ज्योतिष हाच विषय आहे. तथापि त्यांत मध्यम गाथति में मात्र आहेत; आणि ते ग्रंथ ज्योतिःसिद्धांतग्रंथांहून प्राचीन आहेत. ह्मणून हिल्या भागांतच त्यांचे विवेचन केले आहे. वैदिककाल, वेदांगकाल, आणि - तिःसिद्धांतकाल यांच्या मर्यादेचा विचार पहिल्या भागाच्या शेवटी केला आर दुसन्या भागांत ज्योतिषाच्या तीन स्कंधांचा इतिहास आहे. त्यांत गणितस्क. चा इतिहास पूर्वोक्त मध्यम, स्पष्ट, इत्यादि अधिकारांच्या क्रमाने दिला आहे. भु. वनसंस्था, वेध, अयनचलन, यांचे विवेचन त्यांतच आहे. हे विवेचन कारताना अनेक ग्रंथांची आणि ग्रंथकारांची नांवें येणार. त्यांचा इतिहास माहित नसला तर ते विवेचन समजण्यास अडचण पडेल. म्हणून दुसऱ्या भागाच्या आरमाच मध्यमाधिकारांत ज्योतिषगणितग्रंथकार आणि त्यांचे ग्रंथ यांचा इतिहास दिला आहे. आणि त्यांतच ग्रहमध्यमगतिस्थितीचा विचार केला आहे. स्पष्टाधिकारात स्पष्टगतिस्थितीचे विवेचन आहे; आणि पंचांगाची अंगें व आपल्या देशांत निरनिराळ्या प्रांतांत चालणारी सर्व पंचांगे यांचे वर्णन आहे. दोन्ही भागांत कोणकोणते विषय कोणत्या क्रमाने आहेत याचे सविस्तर स्वरूप अनुक्रमणिकवरून दिसून येईल.