पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६७) राहूची गतिस्थिति ९ व्या अध्यायाच्या ५ व्या आर्यंत आहे. परंतु ती आर्या लागत नाही. क्षेपक मध्यरात्रींचे आहेत असें १६ व्या अध्यायाच्या पहिल्या आर्येत स्पष्ट आहे. परंतु ते कोणत्या दिवशींचे ते सांगितले नाही. चैत्र रु०१४ रविवार मध्यरात्रींचे मणजे त्या दिवशी झालेल्या मध्यममेषसंक्रमणापूर्वी ३ घ. ९ पळे या वेळचे ग्रह वर दिलेले भगण घेऊन काढले ते आर्यात दिलेल्या क्षेपकांशी मिळतात. ६ व्या आर्यंत मंगळाचा क्षेपक आहे. त्यांत विकला सोडल्या आहेत असे दिसते. ९ व्या आर्येत बुधक्षेपकांतील विकला सोडल्या आहेत. आणि शुक्रक्षेपकांत ४ विकला कमी आहेत. परंतु क्षेपकांत ह्याप्रमाणे विकला कमजास्त आहेत, त्यांची काही किंमत नाही असें मटले असतां चालेल. यामुळे काही हरकत नाही. वरील भगणादिकांच्या संख्या आणि वर्षमान सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांतील भगणादि माने पुढे दिली आहेत त्यांशी मिळत नाहीत. यावरून दिसून येते की पंचसिद्धांतिकोक्त सूर्यसिद्धांत आणि सांप्रतचा सूर्यसिद्धांत हे भगणादिक मूलतत्त्वांसंबंधे भिन्न आहेत. यांतील पहिल्यापेक्षा दुसरा अर्वाचीन आहे, हे वराहमिहिराने पहिल्याचा मात्र संग्रह केला आहे यावरून दिसते. दुसऱ्याच्या कालाविषयी विचार पुढे केला जाईल. पंचसिद्धांतिकोक्त सूर्यसिद्धांतांतील माने वर दिली आहेत ती उत्पलोद्धत पुलिशमाने वर दिली आहेत (पृ.१६३) त्यांशी सर्वाशी मिळतात. यांतील चंद्रोच आणि राहु यांखेरीज सर्व मानें ब्रह्मगुप्ताने खंडखाद्यांत घेतली आहेत, असे पुढे दाखविले जाईल. ह्या पंचसिद्धांतिकोक्त सूर्यसिद्धांतमानांपैकी वर्षमान आणि बुध गुरु यांचे भगण ही खेरीज करून बाकी सर्व माने पहिल्या आर्यभटाच्या सिद्धांतांतील माने पुढे दिली आहेत त्यांशी सर्वांशी मिळतात असे दिसून येईल. पंचसिद्धांतिकोक्त सूर्यसिद्धांतांतील गुरुखेरीज बाकी सर्व माने घेऊन आणि त्यांस वराहमिहिराने स्वतंत्रपणे सांगितलेला पंचसिद्धांतिकेंतील १६ व्या अध्यायाच्या १० व्या व ११ व्या आर्यांतील बीजसंस्कार देऊन भास्वतीकरणांतील मध्यमग्रह क्षेपक साधले आहेत, असें पुढे दाखविण्यांत येईल.* सूर्यसिद्धांत लाटकत असें अलबीरुणी ह्मणतो. परंतु पंचसिद्धांतिकोक्त सूर्यसिद्धांत लाटकत नव्हे. प्रो० वेबर ह्मणतो की सूर्यसिद्धांताचा टालमीशी संबंध असावा. या दोहांचा विचार पुढें सांप्रतच्या सूर्यसिद्धांताच्या विचारांत करूं.

  • गुरु भगण ३६४२२० धरून भास्वतीकरणांतील क्षेपक मिळत नाहीं. ३६४२२४ धरून जमतो. परंतु पंचसिद्धांतिकत गुरुभगण ३६४२२० घेतले आहेत असे वर दिलेल्या १६ व्या अध्यायांतील २ च्या आर्यच्या पूर्वार्धातील गुणकभाजकांवरून सिद्ध होते. ३६४२२४ धरून १०० भ. गणांस ४३३२२७ दिवस लागतात. उत्पलोक्त पुलिशसिद्धांत आणि सांप्रतचा सूर्यसिद्धांत यांत गुरुभगण ३६४२२० आहेत. हीच संख्या घेउन खंडखाद्यगुरुपेक्षक मिळतो. पहिल्या आर्यभटाच्या सिद्धांतांत गुरुभगण ३६४२२४ आहेत. आणि वराहमिहिराने बार्हस्पत्यसंवत्सर कोणत्याही शकांतला काढण्याची रीति बृहत्संहितेच्या ८ व्या अध्यायांत दिली आहे, तींतील क्षेपक गुरुभगण ३६४२२४ घेउन मिळतो.

डा. केर्नची बृहत्संहिताप्रस्तावना आणि बजेसचे सू. सि. भाषांतर पृ० २ पहा. बर्जस, सूर्यसिद्धांतभाषांतर पृष्ठ ३ पहा.