पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अलबिरुणी म्हणून जो प्रसिद्ध मुसलमान विद्वान् प्रवासी गिजनीच्या महमुदाबरोबर हिंदुस्थानांत आला होता व इ. स. १०१७ पासून १०३० पर्यंत एथे राहून इकडील शास्त्रांचा त्यांत विशेषतः ज्योतिषाचा ज्याने मार्मिकपणे शोध केला होता तो लिहितो की पुलिशसिद्धांत हा पौलस युनानी झणजे पौलस ग्रीक याने केला; ह्मणजे त्याच्या ग्रंथावरून हिंदूंनी रचला. अलबिरुणी ह्यास हिंदुस्थानांत ब्रह्मगुप्ताचा सिद्धांत आणि पुलिश हे सिद्धांत मात्र मिळाले होते. (बाकीचे त्यास पहाण्यास मिळाले नाहीत ) असें वेबर म्हणतो, वर दाखविलेल्या ३ प्रकारच्या पुलिशासिद्धांतांपैकी कोणता त्यास मिळाला होता हे समजल्यावांचून आणि पौलस ग्रीक याचा ग्रंथ सांप्रत उपलब्ध असेल तर त्यांतील मानें तीन पुलिशांपैकी एकाद्याशी कितपत मिळतात हे पाहिल्यावांचून अलबिरुणीच्या म्हणण्याविषयी जास्त विचार करितां येत नाही. वेबर ह्मणतो की "पौलस आलेक्झांड्रिकस ( Paulus Alexandricus ) ह्यांचा ग्रंथ सांप्रत उपलब्ध आहे. परंतु तो ग्रहगणितावर नाही, तर ज्योतिषफलग्रंथ आहे. आणि त्यामुळे अर्थातच पुलिशसिद्धांतांतील मानें त्याशी मिळत नाहीत. हिंदुग्रहगणितांतील पारिभाषिक शब्द मात्र त्यांत कांही आहेत. परंतु कोणते शब्द कसे आहेत हेही वेबरच्या या लिहिण्यावरून स्पष्ट समजत नाही. पौलसचा गणितग्रंथ सांप्रत उपलब्ध नाही. असे दिसते. आणि तो प्रत्यक्ष असल्यावांचून कांहीं अनुमान करणे बरोबर नाहीं. आहे. आणि त्यावरून त्याच्या रचनाकाली पुलिशसिद्धांत उपलब्ध होता. मग तो कोणता होता न कळे. ब्रह्मसिद्धांतावरील पृथूदकटीकेंत (शके ९००) देशातररेखा च पोलिशे पठ्यते ॥ असें म्हणून एक आर्या दिली आहे (अध्या. १ टीका) यावरून त्याच्या वेळी एक आर्याबद्ध पुलिशसिद्धांत उपलब्ध होता असे दिसते. सूर्यसिद्धांत. पंचसिद्धांतिकेंत रविचंद्रानयन पांचही सिद्धांतांतले निरनिराळे सांगितले आहे. परंतु इतर ग्रह सूर्यसिद्धांतांतले मात्र दिले आहेत, आणि यावरून सूर्यसिद्धांतास सर्वांहून जास्त महत्व दिले आहे असे दिसून येते. सर्वांहून स्पष्टतर सावित्र असें प्रथमच चवथ्या आर्येत म्हटले आहे. या दृक्प्रत्ययास मिळणाऱ्या स्पष्टपणामुळे त्यास सर्वांहून महत्व दिले आहे असे दिसते. सूर्यसिद्धांताप्रमाणे अधिमासादिक पंचसिद्धांतिकेच्या १४ व्या आर्यंत सांगितले आहे. ९ वा अध्याय २६ आर्या, दहावा अध्याय सर्व ७ आर्या, यांत सूर्यचंद्रानयन, ग्रहणे, इत्यादि आहेत. २१ वा अध्याय सर्व ६ आर्यांत ग्रहणाविषयींच विवेचन आहे. ते सूर्यसिद्धांतांतलेच दिसते. आणि १६ वा अध्याय सर्व २७ आर्या यांत भौमादि सर्व ग्रह मध्यम, आणि त्यांचे स्पष्टीकरण, वक्रमार्गित्व, अस्तोदय, इत्यादि दिली आहेत. सूर्यसिद्धांताप्रमाणे अधिमास इत्यादि मानें, आणि रवि, चंद्र आणि इतर ग्रह