पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६३) शनि तस्योपरि भ्रवः खे न द्वंद्वै पवनराश्मिभिश्चक्र ।। पवनाक्षितं भानामुदयास्तमयं परिभ्रमति। सर्वेजयिन उदकस्था दक्षिणदिकस्थो जयी शुक्रः॥ पंचसिद्धांतिकेवरून तींतील पुलिशसिद्धांतांत युगपद्धति आहे असे जरी स्पष्ट नाहीं तरी अधिमास आणि तिथिक्षय ज्यांत सांगितले आहेत त्या आर्यांवरून युगपद्धति नसेल असे वाटत नाही. आणि ब्रह्मगुप्ताने त्याबद्दल फक्त रोमकास दोष दिला आहे. यावरून पंचसिद्धांतिकेंतील पुलिशसिद्धांतांत युगपद्धति असावी असे वाटतें. उत्पलाने दिलेल्या पुलिशवचनांत ती आहेच. त्या वचनांत जे सावनमान मटलें आहे, त्यास इतर ग्रंथांत सौर ह्मणतात. आणि त्यांतील सौरमानास इतर ग्रंथांत सावन ह्मणतात. सावन शब्दाचा इतर ग्रंथांतलाच अर्थ घेऊन उत्पलोद्धृत पुलिशसिद्धांतांतील भगणादि मानें अशी:नक्षत्रभ्रम १५८२२३७८०० | शुक्रशीघ्र ७०२२३८८ रविभगण ४३२०००० १४६५६४ सावनदिवस १५७७९१७८०० सौरमास ५१८४०००० चंद्रभगण ५७७५३३३६ अधिमास १५९३३३६ मंगळ २२९६८२४ चांद्रमास ५३४३३३३६ बुधशीघ्र १७९३७००० तिथि १६०३०००००० ३६४२२० । क्षयाह २५०८२२८० वर्षमान दि. ३६५ घ. १५ प. ३१ विपळे ३० यावरून दिसून येतें की पंचसिद्धांतिकापुलिशाचें वर्षमान आणि उत्पलोद्धृत पुलिशाचें वर्षमान ही भिन्न आहेत. यावरून पंचसिद्धांतिकोक्त पुलिशसिद्धांत निराळा आणि उत्पलोद्धृत निराळा होय. आणखी एक चमत्कार असा की उत्पलानें “मूलपुलिशसिद्धांतोक्त " म्हणून एक वचन दिले आहे. तें असें: खखाष्टमुनिरामाश्विनेत्राष्टशररात्रिपाः (१५८२२३७८००) भानां चतुर्युगेनैते परिवर्ताः प्रकीर्तिताः ॥ यांत महायुगांतले नक्षत्रभ्रम दिले आहेत. हे वरील आर्यांतल्यांशी मिळतात. तरी उत्पलाने हे वचन मूलपुलिशसिद्धांतांतलें ह्मणून दिले आहे. आणि तें अनुगुप् छंदाचे आहे. यावरून पंचसिद्धांतोक्त पुलिशाहून निराळे असे दोन पुलिशसिद्धांत उत्पलाच्या वेळी ( श० ८८८ ) होते. म्हणजे एकंदर तीन झाले. उत्पलोद्धृत आर्यांतील शेवटच्या अडीच आर्यांपैकी पहिल्या दोहोंमध्ये सृष्टिसंस्थेचे वर्णन सूर्यसिद्धांतादि इतर सिद्धांतांत सांप्रत आढळते तसेंच आहे. आणि शेवटच्या अर्धात ग्रहयुतीचा विचार आहे. यावरून उत्पलाच्या वेळचा आर्याबद्ध पुलिशसिद्धांत इतर सिद्धांतांप्रमाणेच पूर्ण होता असे दिसते. तसेंच पंचसिद्धांतिकोक्त पुलिशांतील गोष्टी वर दिल्या आहेत त्यावरून तोही पूर्ण होता असे दिसते. पंचसिद्धांतिकोक्त सूर्यसिद्धांतांतील माने पुढे दिली आहेत (पृ० १६६) त्यांशी उत्पलोद्धृत पुलिशांतील भगणादि माने अगदी मिळतात. तसंच युगांतील सावनदिवस आणि त्यांवर अवलंबून असणारे क्षयाह इत्यादि आणि बुध आणि गरु यांचे भगण यांखेरीज बाकीची त्यांतील माने पहिल्या आर्यभटाच्या मानांशी मिळतात.