पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६० ) द्धांतांतलें वर्षमान खेरीज करून बाकी कोणतेही ३६५ दि. १५ घ. ३२ पळे याहून जास्त नाही. म्हणजे वेदांगज्योतिष आणि पितामह यांखेरीज बाकी सर्वांत रोमक खेरीज करून सर्व २ पळाहून जास्त अंतराने नाहीत. रोमक हा पंचसिद्धांतिकोक्त पुलिश आणि सौर यांहून प्राचीन असता तर रोमकांतलेच वर्षमान किंवा त्यांत किंचित फेर करून ते सर्वांनी घेतले असते. त्यापासून फार दूर इतरांच्याने जाववतेना. यावरून पुलिश आणि सौर हे रोमकाहून प्राचीन हे निःसंशय सिद्ध होतें. एकंदरीत पाहतां पंचसिद्धांतिकेंतले पांच सिद्धांत शककालापूर्वीचे होत असें निःसंशय दिसतें. पंचसिद्धांतिकेंतले रोमक आणि पोलिश हे सिद्धांत "इ. स. ४०० हून अर्वाचीन नाहीत, असें डा० थीबोचे मत आहे. इ. स. ४०० च्या सुमारास हे झाले व पंचसिद्धांतिकेंतील इतर सिद्धांत त्याच सुमारास झाले असा त्याचा आशय आहे. परंतु हे मत चुकीचे आहे हे वरील विवेचनावरून दिसून येईल. सांप्रत जो रोमकसिद्धांत उपलब्ध आहे त्यांतील भगणादि माने पुढे दिली आहते. त्यांची वर दिलेल्याशी तुलना केली असतां दिसून येते की दोहोंचें साम्य मुळीच नाही. यावरून सांप्रतचा रोमक शके ४२७ च्या पूर्वी नव्हता. सांप्रतचा रोमकसिद्धांत हा श्रीपेणकत की काय, तसेंच सांप्रतचा वसिष्ठसिद्धांत विष्णुचंद्रत की काय, याविषयी विवेचन पुढे येईल. पुलिशसिद्धांत. पंचसिद्धांतिकेचा पुष्कळ भाग पुलिशसिद्धांताकडे लागला आहे. रोमकसिद्धांताचा अहर्गण पोलिशाहर्गणाच्या जवळ जवळ येतो, असें पहिल्या अध्यायाच्या दहाव्या आर्येत म्हटले आहे. पुढे त्यांतलें सूर्यादिसाधन, चंद्रग्रहण व सूर्यग्रहण आहे. भौमादिग्रहांच्या गतिस्थिति पुलिशाप्रमाणे मुळीच सांगितल्या नाहीत. परंतु शेवटी समारे १६ आयति ग्रहांच्या वक्रमार्गित्वोदयास्ताविषयीं पुलिशसिद्धांतावरून काही सांगितले आहे, असें शेवटच्या आर्यंत “पोलिश सिद्धांते ताराग्रहा एवं" असे म्हटले आहे, त्यावरून दिसते. पुलिशसिद्धांतांतलीं जी मानें कळतात ती अशी :खार्क (१२०) नेमिहुताशन (३३) मपास्य रूपाग्निवसुताशकृतैः (४३८३१)॥ हृत्वा क्रमादिनेशो मध्यः...॥ १४ ॥ अष्टगुणे दिनराशौ रूपेंद्रिय शीतरश्मिभि (१५१) भने । लब्धा राहोरंशा भगणसमाश्च क्षिपेल्लिप्ताः ।। ४१ ॥ वृश्चिकभागा राहोः षड़िशतिरेकलितिकालुप्ताः ॥ ४२ ॥ पहिल्या २५ आर्यांचे एक प्रकरण झाल्यावर पुढें जें प्रकरण लागले त्यांत डा.थीबोची पंचसिद्धांतिका, Introduction, P. LX पहा.