पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५३) कवळ औपचारिक होय असे दिसते. कारण त्यांचे सिद्धांत आणि पंचसिद्धांतिकोक्त पितामहसिद्धांत यांत कांहींच साम्य नाही. ब्रह्मगुप्ताने तर एके ठिकाणी पचवर्षात्मक युगपद्धतीस स्पष्ट दोष दिला आहे, हे वेदांगज्योतिषविचारांत सांगितलेच आहे. तथापि ह्या दोघांच्या पूर्वी पितामहसिद्धांत म्हणून एक सिद्धांत होता, ह्या गोष्टीस बाध येत नाही. पद्धति. पितामहसिद्धांतसंबंधे पंचसिद्धांतिकेंतील दोन आर्या प्रथम दिल्या आहेत. त्यांतील पहिलींत अधिमासस्त्रिंशद्भिर्मासैः असा पाठ आहे. ३० मासांनी एक अधिमास धरला तर फारच चूक पडते असें वेदांगज्योतिषविचारांत दाखविलेंच आहे. परंतु हीच आर्या भटोत्पलाने बृहत्संहिताटीकेंत दिली आहे. (अ०८ श्लोक एकैकमब्देषु० टीका पहा). तीत अधिमासो व्यग्नि (३२) समैर्मासैः मणजे ३२ मासांनी अधिमास असा पाठ आहे. श्रीपतिकत रत्नमालेवरील महादेवकत दीकेंतही ही आर्या आहे (अध्याय १ टीका) तेथेही "अधिमासो व्यग्निसमैः" असा पाठ आहे. अशा महत्वाच्या स्थली पाठाचा संशय ही गोष्ट चमत्कारिक आहे. “विंशद्भिर्मासैः ” असा मूळचा पाठ असून उत्पल, महादेव, यांनी तो फिरविला, असे असते तर ते “व्यग्निसमैः" असा तरी पाठ कशाला देते ? ३२॥ हून कांहीं अधिक इतक्या मासांनी अधिमास पडतो. ह्मणून ते ३२॥ किंवा ३३ अशा अयाचा शब्द घालते. यावरून “व्यग्निसमैः" हाच मूळचा पाठ असावा. वेदांगज्योतिषाप्रमाणे ६२ दिवसांनी एक क्षयदिवस पडतो. आणि वरील आर्यंत ६३ दिवसांनी क्षयदिवस पडतो असे सांगितले आहे. यावरून वेदांगज्योतिषाचे आणि पितामहसिद्धांताचें सर्वांशी साम्य आहे असे नाही. यावरूनही “व्यमिसमैःहाच पाठ मूळचा ही गोष्ट दृढतर होते. ३२ महिन्यांत १ अधिमासा झणजे ८ बात ३ विमासा होतात. ह्मणजे ८ वर्षांत चांद्रमास झाले. यांच्या तिथि २९७० होतात. आणि ६३ तिथीत फाक क्षय याप्रमाणे इतक्या तिथींत ४७१ क्षयतिथि जाऊन ८ वर्षांचे २९२२६ सावन दिवस होतात. ह्मणजे वर्षाचे ३६५ दिवस २१ घटिका झाल्या. वेदांगज्योतिषांतील वर्षमानापेक्षा हे मान पुष्कळ शुद्ध आहे. आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त यांच्यापूर्वी पितामहसिद्धांत होता. तो त्यांच्या वेळी निरुपयोगी झाला होता, यावरून तो त्यांच्यापूर्वी पुष्कळ काळचा असला पाहिजे. त्याचे वेदांमज्योतिषाशी साम्य आहे. तरी दोहोंमध्ये भेदही बराच आहे. वेदांगज्योतिषांत भौमादि ग्रहांचे गणित नाही, ते त्यांत होते असें ब्रह्मगुप्तवाक्यावरून सिद्ध होते. यावरून वेदांगज्योतिषानंतर काही कालाने त्याहन शुद्ध असा पितामहसिद्धांत झाला असें सिद्ध होते. आणि ती गोष्ट महत्वाची आहे. पितामहसिद्धांतांतलें भौमादि ग्रहांचे गणित कसे होते हे समजतें तर भारतीय ज्योतिःशास्त्र कसकसें वृद्धिंगत होत गेले हे समजण्याच्या कामी सम:" हाच मूळचा पाठ द्विगत गणित कणि ती गोष्ट त्या