पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

((१५९) शके ४२७ मध्ये झाले (ह्मणजे त्याने केले ) हे जसें सिद्ध होत नाहीं त्याप्रमाणे पितामहसिद्धांत शककालारंभानंतर झाला असें सिद्ध होत नाही. वेदांगज्योतिषपद्धतीशी त्याचे साम्य आहे यावरून तो शककालारंभाहून पुष्कळ प्राचीन असला पाहिजे हे उघड आहे. मात्र तो कधींचा हे ठरविण्यास काही साधन नाहीं. पहिल्या आर्यभटाने दशगीतिकारंभी मंगल असें केलें आहे:प्रणिपत्यैकमनेकं के सत्यां देवतां परं ब्रह्म । आर्यभटनीणि गदति गणितं कालाकियां गोलं ।। १ ।। यांत "क" ह्मणजे पितामह आणि परब्रह्म यांचे वंदन केले आहे. आणि शेवटच्या आर्येत तर Com आर्यभटीयं नाना पूर्व स्वायंभुवं सदा सद्यत् ॥ यांत स्वायंभुव (ब्रह्मदेवाचें) शास्त्र तेंच आर्यभटीय असें झटले आहे. यावरून आर्यभटाच्या (शक ४२१ च्या) फार पूर्वीचा पितामहसिद्धांत असला पाहिजे. ब्रह्मगुप्त (शके ५५० ) आपल्या सिद्धांतांत म्हणतो की, प्रमोक्तं ग्रहगणितं महता कालेन यत्खिलीभूतं ।। अभिधीयते स्फुटं तत् जिष्णुसुतब्रह्मगुप्तेन ॥ २ ॥ अध्याय १. "ब्रह्मदेवाने सांगितलेलें ग्रहगणित महान् काल गेल्यामुळे खिळखिळे झालें आहे, तें जिष्णुसुत ब्रह्मगुप्त स्पष्ट [ करून ] सांगतो." सांप्रत ब्रह्मसिद्धांत तीन आहेत. एक ब्रह्मगुप्ताचा ब्रह्मसिद्धांत, दुसरा शाकल्यसंहितोक्त ब्रह्मसिद्धांत, आणि तिसरा विष्णुधर्मोत्तरब्रह्मसिद्धांत. यांतील विष्णुधर्मोत्तरसिद्धांत आणि शाकल्य ब्रह्मसिद्धांत हे ब्रह्मगुप्ताच्या पूर्वीचे नव्हत, त्याहुन अर्वाचीन असें माझें मत आहे, ते पुढे येईल. ब्रह्मगुप्ताच्या पूर्वीचे असले तरी शाकल्यब्रह्मसिद्धांताची मूलतत्त्वें सर्वाशी सांप्रतच्या सूर्यसिद्धांतासारखी आहेत. ह्मणजे तो सांप्रत चालू आहे मटले तरी चालेल. खिल झाला नाही आणि विष्णुधर्मोत्तरब्रह्मसिद्धांताचें ब्रह्मगुप्तसिद्धांताशी साम्य नाही अस पुढ दाख. विण्यांत येईल. यावरून ब्रह्मगुप्ताने वरील आर्येत ब्रह्मोक्त गणिताविषया म्हटल आहे तो ब्रह्मसिद्धांत, शाकल्यब्रह्मसिद्धांत आणि विष्णुधर्मोत्तरब्रह्मसिद्धांत या दाहाहून निराळा असला पाहिजे. तेव्हां तो पंचसिद्धांतिकेंतील पितामहसिद्धतिच होय. वेदांगज्योतिषांत रविचंद्रांखेरीज ग्रहांचे गणित नाही, आणि पंचसिद्धांतिकेंतील पितामहसिद्धांतांतही रविचंद्रांचे मात्र गणित आहे. वराहमिहिराने पांच सिद्धांतांपैकी सूर्यसिद्धांतांतले मात्र सर्व ग्रहांचें गणित दिले आहे; पितामहसिद्धांतांतील ग्रहगणिताविषयी काहीच सांगितले नाही. तथापि ब्रह्मगुप्ताने म्हटल्याप्रमाणे त्यांत ग्रहगणित असावे; परंतु ते फार कालामुळे दृक्प्रत्ययास उपयोग नसल्यामुळे वराहाने दिले नसावें. पंचसिद्धांतिकेंत दिला आहे त्याहून निराळा एकादा पितामहसिद्धांत ब्रह्मगुप्तापूर्वी असेल असें दिसत नाही. तर ब्रह्मोक्त ग्रहगणित असें ब्रह्मगुप्ताने म्हटले आहे ते पंचसिद्धांतिकेंतील पितामहसिद्धांतास अनुलक्षूनच होय, आणि त्याने त्या पितामहसिद्धांतास महान् काल लोटला असें म्हटले आहे. यावरून तो शककालापूर्वीचा पुष्कळ प्राचीन असला पाहिजे. आर्यभट आणि ब्रह्मगुप्त यांनी पितामहासद्धांतास जो मान दिला आहे तो