पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १३३ ) सुरू झाली असें लेले यांस म्हणावे लागेल. तसेच ती सुरू झाल्यापासून पुढे पांडवापर्यंत म्हणजे सुमारे २१ हजार वर्षे तरी चालत होती असे मानलेच पाहिजे. परंतु शकापूर्वी २६ किंवा २८ हजार वर्षे या काली सायनगणना सुरू झाली असें ह्मणणे झणजे त्याबरोबर गणिताचे किती आडंबर येते याची कल्पना पंचांगगणिताची माहिती ज्यांस आहे त्यांस होईल. इतकें ज्योतिषगणित आमच्या लोकांस इतक्या प्राचीन काली माहीत होतें असें मला तर वाटत नाही. आमच्या लोकांस २६००० वर्षांपासून किंबहुना त्याहून पूर्वीपासून ज्योतिषगणिताचे उत्तम ज्ञान आहे, त्यांस उत्तम वेध घेतां येत होते, तेव्हांचे ग्रंथ हल्ली लोपले, असें लेले यांचे मत आहे. पंचवीस हजार वर्षे चाललेली पद्धति पुढे एकदम कशी लोपली? तितक्या कालांतले ग्रंथ व गणितज्ञान कसें लोपलें? सुमारे गेल्या दोन हजार वर्षांतील शेंकडों ज्योतिषग्रंथांचा इतिहास माहीत आहे. इतकेच नाही तर एकापासून दुसरा असे ग्रंथ कसे झाले हे अगदी सूक्ष्मपणे समजतें. (हे सर्व पुढे दुसऱ्या भागांत दिसून येईल.) असें असून मागचा एकही ग्रंथ हल्ली उपलब्ध नाही; मागच्या गणिताचा हल्ली मागमूसही नाहीं; शकारंभापूर्वी ५०० वर्षांच्या पूर्वीचे अनेक ग्रंथ उपलब्ध असून त्यांत या सूक्ष्म गणितपद्धतीचा मागमूस नाही. वेद आणि वेदांगज्योतिष ही पांडवांच्या पूर्वीची हें लेले यांस कबूल केलेंच पाहिजे. ते व पांडवांनंतरचे ग्रंथ उपलब्ध असून मधले ज्योतिषग्रंथ आणि ज्योतिषज्ञान ही मात्र लोपली हे गूढ मला उकलत नाही. असो; तर लेले यांनी अश्विनी हे पहिले नक्षत्र मानले, परंतु ते पहिलें असें वैदिककालच्या ग्रंथांत कोठेच नाही, आणि २८ हजार वर्षांपूर्वी सायन निरयनांच सुक्ष्म भेद समजून तो प्रचारांत येण्याजोगें ज्योतिषगणिताचें ज्ञान आमच्या देशांत असण्याचा संभव अनेक प्रमाणांवरून दिसत नाही. या दोन कारणांवरून भारतांतली ग्रहस्थिति सायन नाही. अर्थात् तिजवरून आणलेला काळ खरा नाही. भारतांतली ग्रहस्थिति सायन आहे यावर वरील मोठ्या दोन आक्षेपांखेरीज आणखीही किरकोळ आक्षेप आहेत ते असे :--(३) बृहस्पति आणि शनैश्चर हे विशाखेच्या समीप होते असें भारतांत आहे. यांतील विशाखा हे सायननक्षत्र घे. ऊन सायन स्वातीत गुरु आणि चित्रांत शनि असे गणिताने निघतात ते विशाखेच्या समीप लेले यांनी घेतले आहेत. सायनविशाखा ही दृश्य तारा नाही. तेव्हां चित्रांत व स्वातींत असलेले ग्रह विशाखेसमीप असे सांगण्याची काय गरज होती? स्पष्टच चित्रांत आणि स्वातीत होते असें कां सांगितलें नाहीं? (४) कर्णवध झाला तेव्हां अशी स्थिति सांगितली आहे: बृहस्पतिः संपरिवार्य रोहिणीं बभूव चंद्रार्कसमो विशांपते ॥ ६॥ ह्यांत बृहस्पतीची स्थिति रोहिणीवर आहे, तिची गति होत नाही. (५) शनि रोहिणीला पीडा करीत आहे आणि सूर्यपुत्र भग (फल्गुनी) नक्षत्रास आक्रमन पीडा करीत आहे असें वर्णन आहे. त्याचा विचार लेले यांणी केला नाही. ग्रह एका नक्षत्रास असून दुसऱ्यास पीडा करितो असें म्हणता येईल, आणि सूर्यपुत्र

  • ह्या दोन तीन कलमांत लेले यांचे मत सांगितले आहे ते त्यांनी २१ मे १८९५ च्या खासगी पत्रांत मला कळविले आहे.