पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२१) लेले यांचे मणण्याचा हा सारांश झाला.लेल्यांच्या गणितावर मोठे आक्षेप असे येतातः-भारतांतील ग्रहस्थिति सायन आहे असें लेले यांचे ह्मणणे. परंतु ती सायन नाहीं. नक्षत्रचक्राचा आरंभ सांप्रतच्या ज्योतिषग्रंथांत अश्विनीपासून आहे, तदनुसार लेले यांणी वसंतसंपातापासून पहिले जे नक्षत्र तें अश्विनी असें मानून भारतांतील सायनग्रहस्थिति बसविली आहे. परंतु संपातापासून पहिलें जें नक्षत्र ते अश्विनी हा नियम आला कोठून ? सायन अश्विनी नक्षत्र ही एकादी दृश्य तारा नव्हे. नक्षत्रांस अश्विन्यादि संज्ञा पडल्या त्या मूळच्या दृश्यतारांस पडल्या असल्या पाहिजेत हे उघड आहे. आणि मगलेले ह्मणतात तशी सायनगणना प्रचारांत आली तेव्हां ज्या तारात्मक नक्षत्रांत संपात होता त्याचे नांव संपातापासूनच्या पहिल्या नक्षत्रास पडले असले पाहिजे, हे त्यांस कबूल केले पाहिजे. आणि त्यांच्या मते भारतांतील सायन नक्षत्रे अश्विन्यादि आहेत; तर अश्विनीतारांजवळ संपात होता तेव्हां सायन अश्विन्यादि गणना प्रचारांत आली असली पाहिजे. अश्विनीच्या एकाद्या तारेजवळ संपात शकापूर्वी ८०० पासून ५०० पर्यंत होता. परंतु पांडवांचा काल याहून प्राचीन आहे. तेव्हां शकापूर्वी सुमारे २६ हजार वर्षे या कालीं आश्विनीजवळ संपात होता, त्या काली (किंवा शकापूर्वी २६ हजारांची कोणती तरी पूर्णपट इतकी वर्षे या काली) सायन आश्विन्यादिगणना सुरू झाली असें लेले यांच्या मताप्रमाणे होते. परंतु महाभारतांत आश्विन्यादि नक्षत्रे कोठेच आली नाहीत. कृत्तिकादि नक्षत्रे आहेत व धनिष्ठादि आणि श्रवणादि नक्षत्रांचाही उल्लेख आला आहे. (पृ. ११२,१०० पहा ). इतकेच नाही तर वेदांतही कोठेही अश्विन्यादि गणना आली नाही. वेदांगज्योतिषांतही अश्विन्यादि गणना नाहीं, धनिष्ठादि आहे; आणि देवता वेदास अनुसरून कृत्तिकादि आहेत. क. पा. श्लो. १४ यांत अश्विनी पहिले नक्षत्र आले आहे (पृ.७६ पहा); परंतु त्याचे कारण निराळंच आहे ते तेथे दाखविले आहे. अश्विनी हे आरंभनक्षत्र शकापूर्वी ५०० वर्षे याच्यापूर्वी ( म्हणजे गेल्या २३०० वर्षांपूर्वी ) नव्हतें. सांप्रतच्या ज्योतिषग्रंथांत अश्विन्यादि गणना आहे. परंतु सूर्यसिद्धांतादि ज्या ज्या ग्रंथांत अश्विन्यादि गणना आहे ते सर्व गेल्या २३०० वर्षांहून प्राचीन नाहीत असें पुढें सिद्ध करण्यांत येईल. वैदिककालचे व वेदांगकालचे जेवढे ग्रंथ आहेत-ज्यांत मेषादि संज्ञा नाहींत-त्यांत अश्विन्यादि गणना मुळीच नाही. संपात कृत्तिकातारांजवळ असतां सायनगणना सुरू झाली, आणि संपात जेथे असेल तेथून सायनकत्तिका नक्षत्र लागते, असें मानून व भारतांत ग्रहस्थिति सायन आहे असे मानून पांडवांचा काल काढितां येईल, असे कोणी म्हणेल तर ते खरे आहे. भारतांतील दुहेरी नक्षत्रांत सुमारे सात आठ नक्षत्रांचें अंतर आहे. यामुळे अश्विन्यादि गणना धरून पांडवकाली सुमारे पुनर्वसुंत संपात येतो. शकापूर्वी ५३०६ वर्षे या काली पूनर्वसुंत संपात होता. कृत्तिकादि गणना धरली तर पांडवकाली सुमारें मघांत संपात मानून भारतांतली ग्रहस्थिति मिळवून दाखविता येईल. मात्र पांडवांचा काल आणखी २ हजार वर्षे मागे जाईल; म्हणजे शकापूर्वी सुमारे ७३०० वर्षे हा येईल. कृत्तिकातारांत संपात शकापूर्वी २४०० च्या सुमारास होता. ह्यापूर्वी पांडव झाले. तेव्हां श. पूर्वी २४०० च्या पूर्वी २६००० वर्षे म्हणजे शकापूर्वी मुमारे २८००० वर्षे या काली कृत्तिकांत संपात असतां कृत्तिकादि सायनगणना