पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११६) आतां ग्रहांविषयीं भारतांत काय आहे ते पाहूं. सूर्याचे वर्णन एके ठिकाणी आले आहे त्यांत खालील वाक्य आहे: सोमो बृहस्पातः शुक्रो बुधोंगारक एवच ॥१७॥ इंद्रो विवस्वान् दीप्तांशुः शुचिः शौरिः शनवर ग्रह. वनप. अ. ३, यांत बुधादि पांच ग्रहांची नावे आहेत. ते तु क्रुद्धा महेष्वासा द्रौपदेयाः प्रहारिणः ॥ राक्षसं दृद्वः संख्ये ग्रहाः पंच रवि यथा । २० भीष्मप. अ. १००. यांत ग्रह पांच हा उल्लेख आहे. प्रजासंहरणे राजन् सोमं सप्त ग्रहा इव ।। २२ ॥ द्रोणपर्व, अ. ३७. सात ग्रह चंद्रास पीडा देतात असा पूर्वसंदर्भ आहे. यांत सात ग्रह आले आह निःसरंतो व्यदृश्यंत सूर्यात्सप्त महाग्रहाः ॥ ४ ॥ कर्णप.अ. ३७. यांत सात ग्रह आले आहेत. आणखीही कांहीं स्थली याप्रमाणे उल्लेख आहेत. यांत सात ग्रह आहेत तेव्हां त्यांत राहु केतु सुद्धां येतात, आणि राहु केतु ह तर दृश्य नाहीत. त्यांचे ज्ञान ग्रहणांच्या संबंधे किंवा चंद्राच्या शरासंबंधे हाण्यास संभव. यावरून ग्रहणांची वास्तविक उपपत्ति माहीत झाली होती असे दिसते. ग्रहांची आमच्या ज्योतिषांतली कांहीं नांवें परभाषांतली आहेत मळची संस्कृत नव्हत, असे म्हणणे आहे. परंतु महाभारतांतली ग्रहांची सर्व नांवें मूळची संस्कृत आहेत. ग्रहांच्या वक्रगतीविषयी पुष्कळ ठिकाणीं वर्णन आले आहे. उदाहरणः वक्रगति. लोकत्रास करावास्तां [ द्रौण्यर्जुनौ ] विमार्गस्थौ ग्रहाविव ।। २ ।। कर्णप. अ. १८. प्रत्यागत्य पुनजिष्णुर्जने संसप्तकान् बहून् ।। वक्रातिवक्रगमनादंगारक इव ग्रहः ॥ १ ॥ कर्णप. अ. २०. त्रेताद्वापरयोः संधौ तदा दैवविधिक्रमात् ।। १३ ॥ न ववर्ष सहस्राक्षः प्रतिलोमोभवनुरुः ॥१५ ।। शांतिप. आपद्ध अ. ११. ग्रहयुति. ग्रहांचे युद्ध झणजे ग्रहांचा अति निकट योग याविषयीही पुष्कळ स्थली वर्णन आहे. ततः समभवद्यद्धं शुक्रांगिरसवर्चसोः [द्रोण्यर्जुनयोः ।। नक्षत्रमभितो व्योनि शुक्रांगिरसयोरिव ॥२॥ कर्णप. अ. १८. भृगुसूनधरापुत्रौ शशिजेन समन्वितौ ॥ १८ ॥ शल्यप. अ.११. भारतयद्धकालीन भारती युद्धाच्या वेळी किंवा त्या सुमारास एक दोन महि ग्रहस्थिति. न्यांत असलेली ग्रहस्थिति भारतांत सांगितली आहे, ती देतो. कार्तिक शुक्ल १२ च्या सुमारास कृष्ण कौरवांकडे शिष्टाईस गेला. तो पुढील