पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११५) झाला, ह्मणून तो दिवस पूर्वीच्या पंध्रवड्यांत गेला आणि १३ दिवस मात्र पंध्रवड्यांत आले. याच उदाहरणांत मेषाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतर १० घटिकांनी एका पर्वाचा अंत होईल, तर पुढील पर्वान्त मेषाच्या १५ व्या दिवशी सूर्योदयानंतर ५ घटिकांनी होईल. अर्थात् पंध्रवड्याचे दिवस १३ न होतां १४ झाले. यावरून दिसून येतें की मध्यम मानाने १३ दिवसांचा पंध्रवडा कधीच येणार नाही. यावरून स्पष्ट तिथीचें गणित भारतकाली आमच्या देशांत माहित होते यणजे चंद्रसूर्यांच्या स्पष्ट गतिस्थितींचे ज्ञान होते, असे स्पष्ट दिसून येते; आणि ही गोष्ट फारच महत्वाची आहे. कोणी अशी शंका घेईल की १३ दिवसांचा पक्ष भारतांत आहे तो स्पष्ट तिथीवरून नाही, आणि मध्यमावरूनही नाही; तर केवळ टोळ्यांनी चंद्राची स्थिति पाहून प्रत्यक्ष दिवस मोजून लिहिला आहे. परंतु असें होणे केवळ असंभवनीय आहे. अमावास्येस तर चंद्र दिसत नाही. आणि १३ दिवसांच्या पंध्रवड्याचा संभव वर तिथीच्या घटी दिल्या आहेत तशा प्रसंगी मात्र असतो. तर तशा संधीस पूर्णिमाअमावास्यांच्या सुमारास चंद्राची स्थिति कशी असते याचा थोडासा विचार केला किंवा ती प्रत्यक्ष पाहिली झणजे १३ दिवसांचा पक्ष गणिताच्या साह्यावांचून केवळ प्रत्यक्ष पाहून समजणे अशक्य आहे, अशी खात्री होईल. थोडक्यांत ती गोष्ट एथे सांगतां येणें कठिण आहे. कार्तिक पूर्णिमेला चंद्रग्रहण होऊन पुढील अमावास्येला सूर्यग्रहण झाले होते. वहाच पक्ष १३ दिवसांचा होता असें वरील वचनांवरून होते. शुक्लपक्ष १३ दिमांचा असेल तर त्याच्या आरंभी सूर्यग्रहण आणि अंती चंद्रग्रहण होण्याचा संभव आहे. हे चालू (शके १८१७) वर्षी निरयन वैशाख शुक्लपक्ष १३ दिवसांचा ला होता त्याच्या तिथि पाहिल्या असतां समजेल. परंतु कृष्णपक्ष १३ दिवचा असतां आरंभी चंद्रग्रहण आणि अंती सूर्यग्रहण असण्याचा संभव नाहीं, १३ दिवसांचा एकादा कृष्णपक्ष पंचांगांत काढून पहावा ह्मणजे समजेल. अशी दोन ग्रहणे झाली असें मानिलें तर त्या दोन पर्वान्ताचे अंतर फार तर सुमारे १३ स्विस ३० घटिका होईल. परंतु पक्षाचे स्पष्ट मान १३ दिवस ५० घटिका याहून कमी कधीच नसते. सांप्रतच्या स्पष्ट मानाने आयंती चंद्रसूर्यग्रहण असा १३ दिमांचा पक्ष कधी येत नाही, आणि तसा भारतांत सांगितला आहे. मध्यम माना दिवसांचा पक्ष कधीच येत नाही. यावरून चंद्रसूर्यांच्या स्पष्ट गतीचे गणित हल्लींच्याहन निराळे, अथात् कमी सूक्ष्म, असें पांउपपगली होने असे दिसते. टाँधिनवध झाला त्यावेळी सूर्यग्रहण झाल्याचे वर्णन आहे. राहश्चाग्रसदादित्यमपर्वणि विशांपते ॥ १० ॥ गदाप. अ. २७. परंतु युद्धापूर्वीच्याच महिन्यांत सूर्यग्रहण झाले होते. ह्मणून लागलेच एका महिन्यांत दुसरें ग्रहण होणे शक्य नाही. तेव्हां ही अतिशयोक्ति दिसते. ह्या श्लोकांत तरी पर्व नसतां ग्रहण ज्ञालें असेंच मटलें आहे. १३ व्या दिवशी अमावास्या झाली आणि त्या दिवशी सूर्यग्रहण झाले ही देखील अतिशयोक्ति असण्याचा संभव आहे. तरी त्या वाक्यावरून १३ दिवसांचा पक्ष माहित होता ही गोष्ट नाही ह्मणतां येणार नाही. तेव्हां त्यासंबंधाने वर लिहिलेल्या विचारास बाध येत नाही.