पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इतर तारा. (११३) यांत विशाखांच्या दोन तारा आहेत*. सत्तावीस नक्षत्रांखेरीज इतर तारांपैकी व्याधाचा उल्लेख वर मृगांबरोबर आलाच आहे.. सप्तर्षीन् पृष्ठतः कृत्वा युध्येयुरचला इव ॥ १९ ॥ शांतिपर्व, राजधर्म अ. १००. अत्र ते ऋषयः सप्त देवी चारुंधती तथा ॥ १४ ॥ उद्योगप. अ. १११. यांतील दुसऱ्या वाक्यांत अरुंधतीसह सप्तर्षि आले आहेत. अगस्त्यशास्तां च दिशां प्रयाताः स्म जनार्दन ।। ४४ ॥ उद्योगप. अ.१४३. यांत अगस्त्य आला आहे. योग; करणे. योग आणि करणे कोठे आली नाहींत. मेषादिसंज्ञा. मेषादि संज्ञा भारतांत कोठे आल्या नाहीत हे मागें सांगितलेच आहे. भारताच्या कोणत्याही भागाच्या रचनाकाली त्या प्रचारांत असत्या तर त्यांचा काही तरी उल्लेख भारतांत आल्यावांचून राहिला नसता, अशी सर्व भारत वाचणारांची खात्रीझाल्यावांचून रहावयाची नाही. तेव्हां भारतरचनाकाली मेषादि संज्ञा प्रचारांत नव्हत्या. तसेंच क्रांतिवृत्ताचे १२ विभाग करून तदनुसार ग्रहांची स्थिति सांगण्याची पद्धति भारतांत नाहीं. ग्रहांची व चंद्राची स्थिति जेथे जेथे सांगितली आहे तेथे तेथे ती नक्षत्रांवर सांगितली आहे. सूर्याची स्थिति कोठे फारशी सांगितलेली नाही. तरी वेदांगज्योतिषाप्रमाणे सौरमास सौरमास. त्या काली असलेच पाहिजेत, इतकेच नाही तर पर्वस द्विगुणं दानमुतौ दशगुणं भवेत् ॥ २४ ॥ अयने विषुवे चैव षडशीतमुखेषु च ।। चंद्रसूर्योपरागे च दत्तमक्षयमुच्यते ॥ २५ ॥ वनप. अ.२००. यांत निरनिराळ्या पुण्यकाली दान केल्याचे माहात्म्य सांगितले आहे, त्यांत आठ संक्रांति आल्या आहेत. अयनें दोन, यांस सूर्यसिद्धांतादि ज्योतिषग्रंथांत मकरकर्क या संज्ञा आहेत. विषुवें दोन, त्यांस मेषतुला म्हणतात. षडशीति ही संज्ञा सूर्यसिद्धांतादि ग्रंथांत आहे, व तिचा अर्थ मिथुन, कन्या, धनु, मीन ह्या चार राशि असा सांगितला आहे. वरील श्लोकांत 'षडशीतिमुखेषु' असा बहुवचनीं प्रयोग आहे. यावरून मिथुनादि चार संज्ञांनी बोधित होणाऱ्या कांतिवृत्ताच्या विभागांस षडशीति संज्ञा लावीत असे दिसून येते; व यावरून मूर्याच्या संबंधानें तरी क्रांतिवृत्ताचे १२ विभाग भारतकाली झाले होते असे दिसते. चंद्रसूर्यग्रहणांचा सामान्यतः उल्लेख पुष्कळ स्थली आला आहे. ग्रहणाच्या वेळी, त्यांतही सूर्यग्रहणी, श्राद्ध केल्याचे आणि भूम्यादिग्रहणे. दान केल्याचे फल अनेक स्थली सांगितले आहे. तसेच * कांहीं ज्योतिषग्रंथांत विशाखांच्या ४ तारा आहेत. परंतु त्यांपैकी दोन मात्र (आल्फा आणि बीटा लिबा) चांगल्या तेजस्वी आहेत. तथापि पूर्णचंद्र समीप असतां त्याही चांगल्या तेजस्वी दिसत नाहीत. परंतु शुक्ल पंचमीपूर्वीचा किंवा शुक्ल दशमीनंतरचा चंद्र त्यांमध्ये येतो, तेव्हां तें दर्शन फार मनोहर होते. (ज्योतिविलास, आवृ. २ पृ.३७ पहा.)