पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११२) वाक्यांत तिथि शब्द पुल्लिंगी आहे. घटी, पळे, हीं मान कोठे आढळली नाहीत परंतु याविषयी मी लक्ष्यपूर्वक पाहिले नाही, यामुळे खात्रीने सांगवत नाहीं. सात वार कोठे आले नाहीतच. परंतु 'वार' शब्द मात्र एके ठिकाणी आढळ ला. पांडव द्रौपदीस्वयंवरापूर्वी काही दिवस एकचक्रनगरी वार. एका ब्राह्मणाकडे होते. त्या नगरांत एक राक्षस होता. त्यास प्रत्यहीं एक मनुष्य देत असत. ती पाळी एके दिवशी त्या ब्राह्मणावर आली त्यासंबंधे असें झटले आहे: एकैकश्चापि पुरुषस्तत्प्रयच्छति भोजनं ।। स वारो बहुभिर्वषैर्भवत्यसुकरो नरैः ॥ ७ ॥ आदिपर्व, अ. १६०. आजचा वार एकाकडे उद्यांचा दुसऱ्याकडे अशा अर्थाने वार शब्द यांत आला आहे. वासर शब्द कग्वेदांत आलेला पूर्वी सांगितलाच आहे. यावरून सात बार प्रचारांत येण्यापूर्वीच वार किंवा वासर शब्द दिवसास लावीत असावे असें दिसते. सत्तावीस नक्षत्रांची नांवें सर्व एकत्र अशी दोन स्थळी आली आहेत ( अनुनक्षत्रं. शासनपर्व अध्या. ६४,८९). त्यांत आरंभ कृत्तिका पासून आहे. निरनिराळी नक्षत्रे अनेक स्थळी आहेत. ती सर्व एथे देण्याचे कारण नाही. काही विशेष लक्ष्य देण्यासारखी वाक्ये मात्र देतो. तारारूप मृगाच्या पाठीस रुद्र लागला ह्या वेदांतील कथेचा उल्लेख पुष्कळ स्थळी आला आहे. उदाहरणार्थः अन्वधावन् मृगं रामो रुद्रस्तारामृगं यथा ॥ २० ॥ वनपर्व, अ. २७८. इतर संस्कृत ग्रंथांतही रुद्र मृगामागे लागला असा उल्लेख अनेक स्थळी आहे. सौप्तिकपर्वांत ही कथा थोडी निराळ्या प्रकारे आली आहे. ती अशाः ततो देवयुगेतीते देवा वै समकल्पयन् ।। यज्ञं वेदप्रमाणेन विधिवद्यष्टमीप्सवः ॥ २ ॥ पुढे त्या स्थळीं रुद्र आला आणि ततः स यज्ञं विव्याध रौद्रेण हदि पत्रिणा ।। अपक्रांतस्ततो यज्ञो मृगो भूत्वा स पावकः ॥१३॥ स तु तेनैव रूपेण दिवं प्राप्य व्यराजत ॥ अन्वीयमानो रुद्रेण युधिष्ठिर नास्थल ।। २४ ॥ अध्या. शांतिपर्व, अ. २८३ मोक्षधर्म यांतही ही कथा अशीच आली आहे. पुनर्वसूंविषयी पुढील वाक्य पहाः तावुभौ धर्मराजस्य प्रवीरौ परिपार्थतः ।। रथाभ्याशे चकाशेते चंद्रस्येव पुनर्वसू ।।। कर्णपर्व, अ.. यांत दोन पुनर्वसू चंद्राच्या दोन्ही बाजूस शोभतात असें झटले आहे पंचभिर्धातृभिः पार्थ द्रोणः परिवृतो बभौ ॥ पंचतारेण संयुक्तः सावित्रेणेव चंद्रमाः' माः ॥ आदिपर्व, अ.13 4 यांत हस्तनक्षत्राच्या पांच तारा आहेत. क्षितावपि भ्राजति तत् (कस्यचिद्राज्ञो मुखं) सकंडलं ॥ विशाखयोर्मध्यगतः शशी कर्णपर्व, अ.