पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०३) वरील सर्व सूत्रांत चैत्र, वैशाख अथवा मधुमाधव हे वसंताचे मास अशी परि भाषा दिसून येते. बौधायनसूत्रांत “मीनमेषयोर्मेषवृषभयोवसंतः" यांत मेषादि राशि आहेत. मैत्रेयसूत्रांतलें एक वाक्य वर दिले आहे (पृ. ३२), त्यात सूर्याचे राशिसंक्रमण आले आहे; आणि राशि असा शब्दही आहे. सर्व वेदशाखांची सूत्रे पाहिली असतां ज्योतिषसंबंधैं महत्वाच्या आणखीही पाटा सांपडतील. परंतु मला जास्त सूत्रग्रंथ पहाण्यास सांपडले नाहीत. ३. निरुक्त. निरुक्तांतले ज्योतिषविषयक काही उल्लेख पहिल्या विभागांत आलेच आहेत. अध्याय २ खंड २५ यांत मुहूर्त आणि क्षण ही कालपरिमाणे आली आहेत. सप्त ऋषीणानि ज्योतींषि (१०. २६) यांत सप्तर्षीचा उल्लेख आहे. पुढील वाक्यांत दिवस, रात्रि, शुक्रुष्ण पक्ष, आणि उदग्दक्षिणायनें आली असून त्यासंबंधै कांहीं चमत्कारिक विचार आहेत. अथ ये हिंसामाश्रित्य विद्यामुत्सृज्य महत्वपस्तेपिरेचिरेण वेदोक्तानि वा कर्माणि कुर्वति ते धूममभिसंभवंति धमाद्रात्रि रात्ररपक्षीयमाणपक्षमपक्षीयमाणपक्षादक्षिणायनं दक्षिणायनापितृलोकं प्रतिपद्यते ॥ ८ ॥ अथ ये हिंसामुत्सृज्य विद्यामाश्रित्य महत्तपस्तेपिरे ज्ञानोक्तानि वा कर्माणि कुर्वति तेऽचिरभिसंभवत्यचिषाहेरन्ह आपूर्यमाणपक्षमापूर्यमाणपक्षाददगयनमुदगयनादेवलोकं देवलोकादादित्यमादित्याद्वैद्युतं वैद्युतान्मानसं मानसः पुरुषोभूत्वा ब्रह्मलोकमाभिसंभवांत ते न पुनरावर्तत शिष्टा दंदका यत इदं न जानंति तस्मादिदं वेदितव्यमथाप्याह ॥ ९ ॥ अध्याय १४. खालची महत्वाची वाक्ये पहा. आकाशगुणः शब्द आकाशाद्वायुर्द्विगुणः सर्शन वायोज्योतिस्निगण रूपेण ज्योतिष आपश्मनुर्गुणा रसेनाट्यः पृथिवी चगुणा गंधेन पृथिव्या भूतग्रामस्थावरजंगमास्तदेतदर्युगसहस्र जागात तस्यांते सुबुप्स्यन्नंगानि प्रत्याहरति भूतग्रामाः पृथिवीमपि यति पृथिव्यप आपोज्योतिषं ज्योतिर्वायुं वायुराकाशमाकाशो मनो मनो वियां विद्यामहांतमात्मानं महानात्मा प्रतिभा प्रतिभा प्रकृति सा स्वपिति युगसहस्रं रात्रिस्तावेतावहोरात्रावजलं परिवर्तेते स कालस्तदेतदर्भवति युगसहस्रपर्यंतमहर्यद् ब्रह्मणो विदू रात्रि युगसहस्रांतां तेहोरात्रविदो जना इति ॥ ४ ॥ अध्याय १४. यांत ब्रह्मदेवाचे अहोरात्र सांगितले आहे. सहस्रयुगें हा ब्रह्मदेवाचा दिवस, यांत सृष्टीची उत्पत्ति, स्थिति आणि लय होतात. पुढे एक युगपद्धाति. सहस्र वर्षे प्रति किंवा ब्रह्मा सुप्तावस्थेत असतो. ही ब्रह्मदेवाची रात्र. आणि याप्रमाणे अहोरात्रांचे पर्याय नित्य होत असतात, इतकें यांत सांगितले आहे. इतक्या कालासच सूर्यसिद्धांतादि ज्योतिषग्रंथांत कल्प असे म्हटले आहे. या वाक्यांत कल्प हा शब्द मात्र नाही, आणि युग किती वर्षांचे हैं नाहीं. बाकी गोष्टींत यांतील प्रकार ज्योतिषग्रंथांतील आणि मनुस्मृति इत्यादि

  • याज्ञवल्क्यस्मृति, भगवहीता यांतही हे विचार आले आहेत.