पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दश्यां ॥ (गृ. मू. २. ३.१) “हेमंतशिशिरयोश्चतुर्णामपरपक्षाणामष्टमीष्वष्टकाः " (गृ. २. ४.१) “ अध्यायोपाकरणं श्रावणस्य पंचम्यां " ( ३. ५) इत्यादि वाक्यांत चतुर्दशी इत्यादि शब्द तिथिवाचक दिसतात. अयन, विषुव यांचा उल्लेख बरेच स्थळी आहे. नक्षत्रे आली आहेत त्यांत उत्तर (गृ. २. १०.३) असा बहुवचनीं पुल्लिंगीही प्रयोग आहे. तैत्तिरीयब्राह्मणांत दोन्ही प्रोष्ठपद पुलिंगी बहुवचनी आहेत. “ ध्रुवमरुंधतीं सप्तर्षीनिति दृष्ट्वा वाचं विसृजेत" (गृ. सू. १. ७.२२ ) यांत ध्रुव, सप्तर्षि आणि अरुंधती ह्या तारा आल्या आहेत. अमुक नक्षत्रावर अन्याधान करावें; उत्तरप्रोष्ठपद, फल्गुनी, रोहिणी यांवर शेत नांगरावें; ( गृ. २. १०.३) असें आले आहे. कल्याणनक्षत्रावर उपनयनादि करावी ( गृ. १.४.१), "सीमंतोन्नयनं...यदा पुंसानक्षत्रेण चंद्रमा युक्तः स्यात् ॥ (गृ १.१४) असे सांगितले आहे. यांतील कल्याणकारक नक्षत्रे आणि पुल्लिंगी नक्षत्रे कोणतीं मानीत हे समजत नाही. सांप्रतच्या ज्योतिषमुहूर्तग्रंथांत नक्षत्रांचे पुंस्त्री हे भेद सांगितले आहेत. ते ५५ व्या पृष्ठांत नक्षत्रांची जी लिंगे आहेत, तदनुसारच आहेत. हाच प्रकार सूत्रकालीं असेल. पारस्करसूत्र आश्वलायनसूत्राहून अर्वाचीन दिसते. यांत आश्वलायनसूत्रांत आलेले बहुतेक प्रकार आहेतच. "मार्गशीर्त्यां पौर्णमापारस्करसूत्र. स्यामाग्रहायणीकर्म " असे सांगितले आहे. (३१२) हे आग्रहायणी कर्म आश्वलायनसूत्रांत नाही. विवाहनक्षत्रांत “त्रिषु त्रिषु उत्तरादिषु स्वातौ मृगशिरसि रोहिण्यां" असें मटले आहे. त्याची व्याख्या हरदत्तानें “उत्तरा, हस्त, चित्रा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, उत्तराभाद्रपदा, रेवती, अश्विनी " अशी केली आहे. सांप्रत चित्रा, श्रवण, धनिष्ठा, अश्विनी ही मुहूर्तयंथांत विवाहनक्षत्रांत नाहीत. तसेंच या सूत्रांत ज्येष्ठांवर शेत नांगरावें असें सांगितले आहे. (२. १६). एकंदरीत एका सूत्रांतील विवाहादिकांची नक्षत्रे दुसऱ्या सूत्रांतल्यांशी मिळतात असे नाही. या सूत्रांत "मूलांशे प्रथमे पितुर्नेष्टो द्वितीये मातुस्तृतीये धनधान्यस्य चतुर्थे कुलशोकावहः स्वयं पुण्यभागी स्यात् (१. २१)" याप्रमाणे मूल नक्षत्रावर जन्मल्याची फलें सांगितली आहेत. यांत नक्षत्राचे ४ अंश मानले आहेत, हे एकल मानावेच लागतात. मूलनक्षत्रजन्माच्या वाईट फलाविषयी निरनिराळ्या ग्रंथांची निरनिराळी मते आहेत. तैत्तिरीयश्रुतींत तर मूळ नक्षत्र जन्मसंबंधे चांगले असें मत दिसते. (ते. बा. ३.१.२ पहा). पारस्करसूत्रांत ज्योतिषग्रंथांतलें आश्रेषा नक्षत्रगंड आले आहे. (१. २१). आश्वलायन आणि पारस्कर या दोन्ही सूत्रांत अधिमास, तिथि, नक्षत्र, क्षयवृद्धि ही आली नाहीत. सात वार, मेषादि राशि, योग, करणे, हीही नाहीतच. हिरण्यकेशीसूत्र आणि आपस्तंबसूत्र यांत वरील सूत्रांत सांगितलेल्या ज्योतिष संबंधी बहुतेक गोष्टी आल्या आहेत; मेषादि संज्ञा आणि इतर सूत्रे. वारांची नावे नाहीत.