पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सोईच्या दिसतात, परंतु नक्षत्रसंबंधे त्या सोईच्या आहेत. हा क्षेत्रावरून कालविभाग झाला. आणि १२४ पर्वांवरून नक्षत्राचे १२४ अंश मानिले आहेत, हा कालविभागास अनुरूप असा क्षेत्रविभाग झाला. ही पद्धति जर वेदांगज्योतिषांत आहे, आणि वेदांपासून चालत आलेले वर्षाचे दिवस ३६० त्यांत आहेत, आणि सौरवर्षाचे बरोबर १२ विभाग ह्मणजे १२ सौरमास, महिन्याचे ३० दिवस, आणि दिवसाच्या ६० नाडिका, ही कालमाने आहेत, तर मग त्यावरून सहज सुचणारे वर्तुळाचे राश्यंशादि विभाग ठरविणे ही कल्पना, वेदांगज्योतिषपद्धति ज्यांत स्वतंत्रपणे प्रवृत्त झाली हे निर्विवाद आहे, त्याच भारतीय आयर्यांची असली पाहिजे असें अ. नुमान निवत नाही काय? (३) अथवज्योतिष. आतां अथर्वज्योतिषाचा विचार करूं, याचे १६२ श्लोक आहेत आणि त्यांत १४ प्रकरणे आहेत. हे पितामहानें काश्यपास सांगितले आहे. यांतले विषय थोडक्यात सांगतो. प्रथम कालपरिमाणे अशी सांगितली आहेत:१२ निमेष-लव ३० त्रुटि-मुहूर्त कालमानें. ३० लव =कला ३० मुहूर्त-अहोरात्र. ३० कला-त्रुटि पुढे १५ मुहूर्ताची नांवें सांगितली आहेत. आणि द्वादशांगुल. *शंकूची अमुक लांब छाया हे त्याचे प्रमाण मानले आहे. ते मुहूर्त असे:छाया अंगुलें. मुहूर्त. छाया अंगुलें. रौद्र ९६ (परम) ५सावित्र २ श्वेत ६ वैराज ३ मैत्र १२ ७ विश्वावसु ४ सारभट ८अभिजित् यस्मिन् छायाप्रतिष्ठिता (ज्या मुहूर्ती छाया स्थिर होते ) असें अभिजित्चें लक्षण केले आहे. मध्यान्हानंतरच्या मुहूर्ताची छाया वरच्या उलट आहे. यांत मध्यान्हींची छाया शून्य आहे असें ह्मणतां येत नाही, परंतु ती तीन अंगुलांहून कमी असली पाहिजे. छायेवरून स्थल काढण्याचा प्रयत्न करितां येईल, परंतु सूक्ष्मपणे अवलोकन करून ही; अंगुलें दिली असतील असे वाटत नाहीं; आणखी वर्षांत नेहमी छाया सारखी असत नाही इत्यादि बऱ्याच अडचणी आहेत. आणि गणिताची मेहनत करून त्यासारखे महत्वाचे काही निष्पन्न होईल असें दिसत नाही. ह्मणून अथर्वज्योतिषाच्या स्थलनिर्णयांचा विचार करीत नाही.. रौद्र मुहूर्तावर रौद्र कर्मे करावी; मैत्रावर मैत्र कर्मे करावी; अशा प्रकारे पुढे करणे. सांगितले आहे. चौथ्या प्रकरणांत तिथींची करणे सांगिशुभकाल. तली आहेत. त्यांची नांवें आणि पद्धति सांप्रतच्या m

  • सूर्यसिद्धांतादि ज्योतिषग्रंथांत छायार्थ सर्वत्र १२ अंगलांचा शंकु घेतला आहे. तो या ज्योतिषांत आहे हे लक्ष्यांत ठेवण्यासारखे आहे.